Monday, April 28, 2025
घरमहाराष्ट्रअर्थसंकल्पातील या ५ महत्वाच्या घोषणा

अर्थसंकल्पातील या ५ महत्वाच्या घोषणा

प्रतिनिधी : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा केल्या आहेत.
सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ते मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार

त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहिन्याला 1500 रुपये मिळणार

‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ मार्फत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ मिळणार

दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात पेट्रोल-डिझेलचा दर बऱ्यापैकी स्वस्त होणार. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments