ताज्या बातम्या

सरताळे येथे दारू धंद्याच्या धाडीसोबत रोख रक्कम गल्ल्यातून लंपास केल्याची तक्रार…

कुडाळ(अजित जगताप) : संपूर्ण जावळी तालुका हा दारूबंदी तालुका असल्यामुळे या ठिकाणी परवानाधारक दारू दुकाने नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत दारू विक्री केली जाते. याबाबत चार दिवसापूर्वी पोलिसांनी सरताळे तालुका जावळी येथील राज इंडियन या हॉटेलवर धाड मारली व विक्रीसाठी ठेवलेल्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. ही कायदेशीर बाब झाली असली तरी या हॉटेलच्या गल्ल्यातून ४३ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची लेखी तक्रार हॉटेल व्यवसायिक श्री सचिन भिसे यांनी मेढा पोलीस ठाण्याला केल्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, या प्रकरणाची नोंद सी.सी.टी.व्ही.त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत माहितीगारांनी सांगितले की , बुधवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दोन महिला व दहा पुरुष अशा व्यक्तींनी हॉटेल राज इंडियन या ठिकाणी प्रवेश करून धाड मारली. याबाबत परिचित व्यक्तीकडून अधिक माहिती घेतले असता हे सर्व साध्या विषयातील पोलीस आहे. असे सांगण्यात आले. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक सचिन तुकाराम भिसे यांनी त्यांना कोणताही विरोध न करता कायदेशीर रित्या सहकार्य केले. पोलिसांनीही हॉटेलच्या कॅश काउंटरच्या आसपास असलेली अनधिकृत दारू बाटल्या जप्त करून पिशवीत भरल्या. त्यानंतर या धाडीमध्ये सहभागी असलेल्या एका साध्या पोशाखातील पोलिसांनी हॉटेलच्या कॅश काउंटर च्या गल्ल्यांमध्ये हात घालून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले रोख रक्कम ४३ हजार रुपये लंपास केल्याची बाब सी.सी.टी.व्ही. मध्ये कैद झाली आहे. नवलाईची गोष्ट म्हणजे दारू जप्त करण्यात आली. परंतु, रोख रक्कम बाबत नोंद केली नाही. असा संशय श्री . सचिन तुकाराम भिसे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांनी मेढा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली . सदर बाब सत्य असेल तर ही बाब गंभीर असून पोलीस जर रक्षक ऐवजी भक्षक झाले तर न्याय कुणाकडे मागावा ? अशी दोलयमनस्थिती श्री भिसे यांची झालेली आहे. या प्रकरणाची चार दिवस चर्चा होत आहे.
श्री भिसे यांनी एका
पतसंस्थेतून काही कामासाठी ५५ हजार रुपये काढले होते. त्यातील वीस हजार रुपये सेंट्रल बँकेत भरले व उर्वरित रक्कम ३५ हजार रुपये रक्कम त्याचबरोबर आठ हजार रुपयाचा व्यवसाय केलेली एकूण रोख रक्कम ४३ हजार रुपयाची रक्कम राज इंडियन हॉटेलच्या कॅश काउंटर मधील गल्लीत ठेवण्यात आली होती. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी लॉजची तपासणी करण्याचे सांगून श्री भिसे यांना सोबत घेऊन गेले. यावेळी कॅश काऊंटर जवळ तपासणी करणाऱ्या एका पोलिसांनी कॅश काऊंटर मधील गल्ल्यात हात घालून पैसे घेतल्याचे सी.सी.टी.व्ही. मध्ये दिसून येत आहे. यानंतर श्री भिसे यांना मेढा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. असे श्री भिसे यांनी मेढा पोलीस ठाण्यात लेखी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तसेच याबाबत सातारा पोलीस अधीक्षक यांनाही समाज माध्यमाद्वारे माहिती देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.
सरकारी अधिकाराचा
दुरुपयोग करून बेकायदेशीररित्या हॉटेलच्या कॅश काऊंटर मधील गल्ल्यातून पैसे लंपास केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या गोष्टीला चार दिवस होऊन सुद्धा कॅश काऊंटर गल्ल्यातून लंपास केलेले पैसे पोलीस ठाण्यात जमा केले किंवा ते परत दिले? बाबत कुणीही समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही. त्यामुळे अधिकच संशय बळावला आहे. श्री भिसे हे गेली पंधरा वर्षापासून सरताळे तालुका जावळी येथे अनाधिकृत पणाने दारू व्यवसाय करत आहेत. हे त्यांना मान्य आहे. परंतु, राज इंडियन हॉटेल मधील कॅश काउंटरच्या गल्ल्यातील पैसे घेणे. ही बाब त्यांच्या मनाला पटली नाही. त्यामुळेच त्यांनी लेखी तक्रार केली आहे. या गोष्टीची स्वतः सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी नोंद घ्यावी. अन्यथा या प्रकाराबाबत लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, सदरची गोष्ट सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यामुळे हा सीसीटीव्ही नष्ट करण्यासाठी अनेक युक्ती केल्या जात असल्याचाही आरोप होऊ लागला आहे. ……………………………..

फोटो-सरताळे तालुका जावळी येथे कॅश काउंटर मधून पैसे घेतानाचा सीसीटीव्ही फुटेज असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Scroll to Top