सातारा(अजित जगताप) : महात्मा गांधी जयंतीच्या दिनी पत्रकार परिषद घेऊन सामाजिक कार्यकर्ते हेमंत मोरे यांनी करंजे तर्फ सातारा येथील गोपाळनाथ महाराज देवस्थानच्या जमीन हडप करणार्या चोराचा पर्दाफाश केला आहे. असे श्री मोरे यांनी सांगितले. यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
सातारा शहरा नजीकच्या गट नंबर १५५ ही मूळची जमीन माननीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज सातारा यांची होती. जानेवारी १८७४ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी गोपालनाथ महाराज देवस्थान यांना सनद देऊन वार्षिक १४ रुपये भाडे ठरवले होते. त्यानंतर कालांतराने या जमिनीबाबत न्यायालयामध्ये वादविवाद झाला. ही जमीन देवस्थान इनामाची आहे, हे न्यायालयाने सिद्ध करण्यात आले. या जमिनीवर हक्क सांगणारे सोमगिरी यांचीही वडिलोपार्जित अथवा स्वकष्टात किंवा कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेली जमीन नव्हती हे सुद्धा न्यायालयाने मान्य केल्याची माहिती मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या जमिनीचा व्यवहार करणारे यांच्या नावे मुंडीत पत्राने कधीही दत्तक घेतल्याचे स्पष्टपणे नमूद केले नाही. सोमगिरी यांनी बापू यांना कधी दत्तक घेतले नव्हते. अगर ते वारसही नव्हते. त्यामुळे द्वारकाबाईचा या जमिनीशी कोणत्याही संबंध शाब्दिक झाला नाही. तशा पद्धतीने दिवाणी न्यायालयाने निकाल पत्रकात नमूद केले, असाही त्यांनी दावा केला. दिनांक ३ एप्रिल १९९७ रोजीच्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून भ्रष्ट मार्गाने द्वारकाबाई यांचे नाव फेरफार क्रमांक २३४९८ ने ७/१२ वर चढवण्यात आले. या निकालाबाबत गोपाल विश्वनाथ घोलप यांनी अपील केले.
या जमिनीबाबत विविध फेरफार क्रमांक नुसार बदल करण्यात आला असला तरी दिनांक २५ सप्टेंबर २००३ रोजी संबंधित तलाठी व मंडल अधिकार्यांनी संगनमत करून अपील कालावधी संपण्यापूर्वीच ही नोंद करून घेतली आहे. याबाबतही अपील करण्यात आले. या जमिनीचा मालकी हक्काचा दावा करणार्या द्वारकाबाई बापू गिरीगोसावी यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सुहास उर्फ मणी लाल लक्ष्मण गिरीगोसावी यांनी कुलमुखत्यार पत्र करून घेतले. आर्थिक बळावर कागदपत्र गोळा करून याबाबतचे व्यवहार केले. तसेच खोटी माहिती देऊन महसूल विभागाची फसवणूक केली आहे. देवस्थान इनामी वर्ग तीन वगळून वर्ग एक मध्ये रूपांतरित केल्यानंतर या जमिनीचा विक्री व खरेदीचा व्यवहार सुहास गिरीगोसावी, सौ. वैशाली शशिकांत शिंदे व सुनील लक्ष्मीनारायण झंवर या तिघांनी मिळून केला आहे. असाही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी त्यांनी आरोप केला. जमिनीचा व्यवहारच मुळात न्यायालयाचा अवमान आहे. सातारचे जिल्हाधिकारी यांनाही खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.
ही जागा ज्यादा दराने विकासकाला देण्याचा हा डाव असल्यामुळेच हेमंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वे नंबर १५५ मधील जमीन सातारा जिल्हाधिकारी यांनी ताब्यात घेऊन सर्व फेरफार रद्द करावे व सर्व बनावट गोष्टी करणारे भोंदू वारकरी सुहास उर्फ मणीलाल लक्ष्मण गिरीगोसावी यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, असे निवेदन सातारचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
फक्त हा करंजे तर्फ सातारा येथील बनावट व्यवहार नसून जिल्ह्यातील अनेक असह्य लोकांचा फायदा घेऊन जमिनी लाटण्याचा प्रकार सुरू आहे. वारकरी संप्रदायात वारकरी असल्याचे भासवून गैरव्यवहार झाले आहेत. मोठ्या नेत्यांचे सोबत फोटो काढून काही प्रशासकीय अधिकार्यांना दाखवून दबाव टाकण्याचाही प्रकार घडला आहे. याबाबत आता कागदपत्राचे आधारे न्याय निवाडा करावा. स्वतःला लोकप्रतिनिधी समजणारे हे बहुरूपी असून शस्त्र बाळगून धमकी दिली जात आहे. संबंधित जमिनीचे सर्व व्यवहार रद्द करून देवाच्या जमिनीची चोरी करणार्या सातार्यातील भोंदू खरात वर सक्त कारवाई करावी, अशी त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीररित्या मागणी केली आहे. संबंधित व्यक्तींनी ज्यांची फसवणूक केली आहे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा हेमंत मोरे यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नम्र आवाहन केले आहे. दरम्यान, जमिनीच्या व्यवहाराची सत्यता पडताळणी करून जिल्हाधिकार्यांनी न्याय निवाडा करावा. कोणावरही अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




