ताज्या बातम्या

कराड दक्षिणेत अतुल भोसले–उदयसिंह पाटील यांची संयुक्त उमेदवारी; बिनविरोधासाठी प्रयत्न

कराड (प्रताप भणगे) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी कराड दक्षिण मतदारसंघातून आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ॲड. उदयसिंह पाटील यांनी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोघांनी एकत्रितपणे अर्ज दाखल केल्याने कराड दक्षिणेतील राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच सोसायटी गटातून ॲड. उदयसिंह पाटील हेच अधिकृत उमेदवार असतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आपण दाखल केलेला अर्ज कायम ठेवणार असून तो ॲड. पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविण्यासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या ग्वाहीमुळे कराड दक्षिणेतील सहकार क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Scroll to Top