ताज्या बातम्या
दिव्यांग विवाहाबाबतचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्यासाठी शासनाचा पुढाकार दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन – सचिव तुकाराम मुंढेमराठी शाळांच्या गळचेपीविरोधात पालिकेवर मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतर हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलनएसआरएवर मोर्चा नेण्याचा धारावी बचाव आंदोलनचा इशारा* हजारो लोकांना धारावीबाहेर स्थलांतरीत करावे लागेल डीआरपीच्या भूमिकेने धारावीत संतापलेझीमच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान थेट लाल किल्ल्यावरस्त्री हक्कांच्या नव्या पर्वाची सुरुवात : समानतेचा निर्धार…. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद; २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व एका मंचावर

भवानी कृपा हौ. सोसायटी, चारकोप, कांदिवली – मुंबई येथील सोसायटीमधील सर्व महिलांतर्फे वट पौर्णिमा साजरा

मुंबई (शांताराम गुडेकर ) हिदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.यादिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. भवानी कृपा हौ. सोसायटी, चारकोप, कांदिवली - मुंबई येथील सोसायटीमधील सर्व महिलांनी वट पौर्णिमा साजरी करत वट वृक्षाची पूजा करून एक नवा पायंडा पाडला. निसर्ग प्रकोप टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावणे गरजेचे आहे. साई परिवारतर्फे गेल्यावर्षी दिवसाला एक झाड अशी ३६५ झाडे लावण्याचा संकल्प केला आणि त्याला चांगला प्रतिसाद लाभला. वर्षभरात चक्क ५२२ लावण्यात आली.यावर्षीही प्रत्येक दिवस एक झाड लावण्याचा पुन्हा संकल्प केला आहे. गेली पाच वर्ष हा उपक्रम राबविण्यात आला.एक वडाचे रोपटे घेऊन वर्षभर त्याचे संगोपन करून त्याची वट पौर्णिमा दिवशी यथासांग पूजा करून ते वट झाड योग्य ठिकाणी लावले जाते. या उपक्रममध्ये सौ.मनीषा रासम,सौ.मीनल सावंत,सौ. भक्ती सावंत,सौ.दीपाली महाडिक,सौ.सुजाता गावडे,सौ. नेहा सुर्वे, सौ.मेघना बाईत, सौ.मृणाल लवंगारे, सौ. नम्रता राऊळ, श्रुती राणे यांनी पर्यावरण सेवेत सहभाग घेऊन आज २१ जून रोजी 'वट सावित्री पौर्णिमा' साजरी केली.करवा चौथ प्रमाणेच वट सावित्री व्रत हे पतीचे दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवनाचे रक्षण करण्यासाठी पाळले जाते. या सणाला वट पौर्णिमा व्रत किंवा वट सावित्री व्रत किंवा वटपौर्णिमा असेही म्हणतात. हा एक हिंदू उत्सव आहे जो प्रामुख्याने विवाहित महिलांनी साजरा केला जातो. हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. दरवर्षी वट पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. हा विशेष दिवस आहे जेव्हा महिला उपवास ठेवतात आणि त्यांच्या पतीच्या आशीर्वाद आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वट पौर्णिमा सहसा विवाहित स्त्रिया साजरी करतात.याच निमित्ताने तुमच्या प्रिय व्यक्तीला या खास दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.आला आला सण सौभाग्याचा,सवाष्णी मिळून वडाला पूजण्याचा,लेवूनी लेण मांगल्याच,दीर्घायुष्य मागू नवरोबाच,मारू सात फेऱ्या वडाला,मागू सात जन्म ह्याच नवरोबाला...!

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top