Sunday, August 31, 2025
घरमहाराष्ट्रडॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी दिला भाजपचा राजीनामा ; काॅंग्रेस पक्षात...

डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी दिला भाजपचा राजीनामा ; काॅंग्रेस पक्षात घेतला प्रवेश ;

प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठात बायोलॉजिकल विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी आझाद मैदान, मुंबई येथील राजीव गांधी काॅंग्रेस भवन येथे मुंबई विभागीय काॅंग्रेस अध्यक्षा, खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार वर्षाताई गायकवाड यांनी डॉ. उज्ज्वला जाधव यांना काॅंग्रेस पक्षात प्रवेश देतांना त्यांच्या हाती काॅंग्रेस पक्षाचा झेंडा दिला आणि पक्षाच्या मजबुतीसाठी डॉ. उज्ज्वला जाधव या उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी एक भला मोठा पुष्पहार मुंबई काॅंग्रेस अध्यक्षा खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड आणि डॉ. उज्ज्वला जाधव यांना घालून आनंद व्यक्त केला. डॉ उज्ज्वला जाधव या २०१४ पासून भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी डॉ उज्ज्वला जाधव यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष लल्लुसिंग आर्य, प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. डॉ उज्ज्वला जाधव यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला तेंव्हा माजी आमदार अशोक जाधव, विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असतांना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारताचे संविधान बदलण्याची भाषा वारंवार करीत होते. यासाठी चारशे पार चा नारा दिला जात होता. मी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निष्ठावंत कार्यकर्ती असून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असल्याने मला ही भारतीय जनता पार्टीची भूमिका पटत नव्हती म्हणून मी भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या निष्कर्षाप्रत आले होते. काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुंबई काॅंग्रेस अध्यक्षा खासदार प्रा वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री नसीम खान आदींची भेट घेऊन चर्चा केली आणि अखेर आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या प्रचंड यशस्वी झालेल्या भारत जोडो व भारत न्याय यात्रेने प्रभावित होऊन प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेतला, असे डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले. प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी लवकरच डॉ. उज्ज्वला जाधव यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments