‘
प्रतिनिधी : ठाणे येथे दिनांक ८ जून २०२४ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पाडण्यात आला त्यावेळी जीवन गौरव, समाज भूषण, विद्या भूषण,साहित्य भूषण असे पुरस्कार देऊन अनेक प्रतिभावंत मान्यवरांना गौरवण्यात आले.
कराड न्यूजचे लोकप्रिय लेखक/कवी मा.सत्यवान मंडलिक यांच्या विविधांगी साहित्य लेखनामधून साकार झालेला ‘म्हातोबाचा माळ’ हा ग्रामीण कथासंग्रह मागील वर्षी दिनांक ५जून २०२३ रोजी पुण्यातील ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र पब्लिकेशन व सामाजिक संस्थेच्या वतीने राज्य संयोजक आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय विक्रम अडसूळ सर यांच्या प्रयत्नाने व सहकार्याने पार पडला होता. आज त्या पुस्तकास दिनांक ८ जून २०२४ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने निवड केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ साठी ‘सावित्रीबाई फुले साहित्य भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे प्रेरणास्थान संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर तथा कवी गोलघुमट व ठाणे शहर विधानसभा सदस्य माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
मा. सत्यवान मंडलिक आपल्या विविध अंगी साहित्य लेखनाने महाराष्ट्रभर परिचित आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याचबरोबर कथा, कविता, राजकीय, सामाजिक विषयावरील वैचारिक लेख दैनिक, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक अशा माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत असतात. तसेच ते साप्ताहिक कराड न्यूजच्या माध्यमातून नियमित वाचकांच्या जवळ असतात. त्यांच्या प्रतिभावान लेखनाची दखल घेऊन त्यांना २०२४ या वर्षात ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र यांच्या वतीने साहित्य गौरव, हेल्पिंग वेअर फेअर यांच्या वतीने कालिदास सन्मान तर मराठी साहित्य मंडळाच्या वतीने ‘सावित्रीबाई फुले साहित्य भूषण’ असे सलग तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्याबद्दल कराड न्यूजचे मुख्य संपादक माननीय श्री दशरथ पवार साहेब यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून व विविध क्षेत्रातून त्यांचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने केले होते. उद्घाटक माननीय संजय केळकर साहेब- आमदार ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ, स्वागताध्यक्ष- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, कार्यक्रमाचे अध्यक्ष- ज्येष्ठ लेखक मा. सिद्धेश्वर कोळी (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष उस्मानाबाद), मुख्य अतिथी- सौ प्रतिभाताई मढवी (माजी नगरसेविका नौपाडा विभाग) व डॉक्टर श्री राजेश मडवी, ज्येष्ठ कवयित्री मा. ललिता गवांदे (नाशिक), जेष्ठ कवित्री मा. लता हेडाऊ (वर्धा जिल्हाध्यक्षा), ज्येष्ठ कवी मा. सुरेश लोहार (कराड), जेष्ठ गजल सम्राज्ञी मा. नीलाताई वाघमारे (ठाणे), विशेष अतिथी- मा. सिद्धार्थ कुलकर्णी (मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष), मा. डॉ. घनश्याम पांचाळ (महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क अधिकारी), मा.मीना पगारे (मुंबई शहर अध्यक्षा मध्य विभाग), मा. राजेश थळकर (रायगड जिल्हाध्यक्ष अलिबाग) मा. डो-रलाकर मुळीक (नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नागपूर), सन्माननीय पाहुणे- मा. डॉ. नीता बोडके (पुणे शहर अध्यक्षा), मा. विद्या थोरात काळे (मुंबई शहर अध्यक्षा पश्चिम विभाग), ज्येष्ठ लेखक मा. अवधूत शिरोडकर (उत्तर जिल्हा अध्यक्ष गोवा) तसेच मराठी साहित्य मंडळाच्या सचिव मा.सौ. वर्षा थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत गीत ज्योती किरतकुडवे-साबळे (दिवा) यांनी गायले. आयोजन मा. प्रणिता देवरे (ठाणे जिल्हा उपाध्यक्षा)आणि डॉ. राजेंद्र कडवे, (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष) यांनी केले तर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका अनघा जाधव (नेरूळ नवी मुंबई) यांनी केले.
काव्य संमेलनात महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या कवींनी सहभाग नोंदवून आपल्या खास शैलीत कविता सादर करून रंगत भरविली. अनेक नवोदित कवींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.