ताज्या बातम्या

कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांची तोडक कारवाई; बेकायदेशीर धंद्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न

नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या बेकायदेशीर हालचालींवर आळा घालण्यासाठी कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या वतीने पुन्हा एकदा तोडक कारवाई करण्यात आली. मोकळ्या जागेत दारू पिणाऱ्या काही दारुड्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई करत परिसरातून हकालपट्टी केली.
या भागात अनेक दिवसांपासून बेकायदेशीर धंदे सुरू असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत होती. तसेच काही बेघर नागरिक आणि झोपडीधारक स्टेशन परिसरातच वास्तव्यास असून तेथेच अन्नधान्य साठवण व रेशनसारख्या सुविधा घेत असल्याचेही समोर आले आहे.
कोपरखैरणे पोलीस स्टेशन च्या पथकाकडून आठवड्यातून दोन वेळा अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात असल्या तरी परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याचे चित्र आहे. कारवाईनंतर काही दिवस शिस्त दिसून येते; मात्र पुन्हा तेच प्रकार सुरू होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
आज करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांनी अनधिकृतरीत्या वास्तव्य करणाऱ्यांना हटवून परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Scroll to Top