नवी मुंबई : रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी कोल्हापूर, कलेची नगरी असलेल्या ऐतिहासिक करवीर नगरीत व्ही. टी. पाटील सभागृह ताराराणी विद्यापीठ येथे नवी मुंबईतील ज्येष्ठ रंगकर्मी सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांना सतत 29 वर्षे बाल नाट्य चळवळ अखंड सुरू आहे बालनाट्य क्षेत्रात मोठे योगदान दिल्याबद्दल स्वराज्य युवा प्रतिष्ठान व ताराराणी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मा श्री समीर काळे आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते श्रीहरी पवळे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील पन्नास कलागुणी कला क्रीडा क्षेत्रातील योगदान देणाऱ्या कलाकारांचे सन्मान करून गौरविण्यात आले. नवी मुंबईतील विविध नाट्य संस्था बालकलाकार आणि त्यांचे पालक श्रीहरी पवळे यांना राज्यस्तरीय RISING STAR पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे




