ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

पालघर जिल्ह्यातील ता.डहाणू येथे आदिवासी महिलांसाठी मध मिशन कार्यक्रम अंतर्गत वैज्ञानिक पध्दतीने मधमाशी प्रशिक्षण शिबिर संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर ) : स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्मा.मा.खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशाने व मुंबई प्रदेशाध्यक्ष मोहन वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी पक्ष,डब्ल्यू.एच.आर.एफ.आणि खादी ग्रामोद्योग विलेज इंडस्ट्रियल कमिशन भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील ता.डहाणू येथील रंकोळ या ठिकाणी दि.१५/०२/२०२६ रोजी आदिवासी महिलांसाठी मध मिशन कार्यक्रम अंतर्गत वैज्ञानिक पध्दतीने मधमाशी प्रशिक्षण शिबिर पार पडले.या शिबिरास स्थानिक आदिवासी महिलांनी त्याचा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.याप्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोगाचे सहाय्यक संचालक ईश्वरचंद्र जी.कृषी अधिकारी व प्रशिक्षक प्रशांत गावडे,रंकोळच्या सरपंच सौ.वनिता करमोडा,उपसरपंच मुलचंद बोलाढा,विशेष सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सिक्कीम करमोडा, किरण बोडके,अरविंद गुरव,क्रिस्टिनो स्वामीनाथन
महेश व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top