ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘विशेष टपाल तिकीट’ जारी करा – माजी खासदार राहुल शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, ‘विशेष टपाल तिकीट’ जारी करण्याची मागणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना शेवाळे यांनी दिलेल्या लेखी निवेदनाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

आपल्या निवेदनात शेवाळे यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचा उल्लेख केला आहे. 1960 च्या दशकापासून पुढची 50 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय पटलावर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक हिंदुत्ववादी लोकनेता, महान व्यंगचित्रकार, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा वक्ता अशा विविध रूपांत बाळासाहेबांनी नेहमीच आपली भूमिका परखडपणे मांडली. त्यांची लेखणी, त्यांची भाषणे आणि त्यांच्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग जागविले, असेही शेवाळे यांनी निवेदनात लिहिले आहे.

नुकतीच, 27 जानेवारी रोजी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती देशभरात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वंदनीय बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली द्यावी, ही देशभरातील लाखो चाहत्यांची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टपाल तिकीट जारी करून यथोचित सन्मान करावा, अशी मागणी शेवाळे यांनी निवेदनातून केली आहे.

“माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांसाठी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे एक स्फूर्तीस्थान आहेत. त्यांच्या परखड हिंदुत्ववादी विचारांनी देशभरातील सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विशेष टपाल तिकीट जारी करून वंदनीय शिवसेनाप्रमुखांना अनोखी आदरांजली द्यावी, अशी मागणी केंद्रीय दळणवळण मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच भारतीय टपाल विभागाकडून अशा प्रकारचे विशेष टपाल तिकीट जारी केले जाईल, याची मला खात्री आहे”
-राहुल रमेश शेवाळे, माजी खासदार

Scroll to Top