ताज्या बातम्या

श्री गुरु दत्तात्रय महाराज कळंबे सेवा गौरव पुरस्काराने डी.जी. जाधव सन्मानित

मुंबई(अजित जगताप) : मुंबईसारख्या शहरांमध्ये माथाडी व कापड बाजार कामगारांच्या श्रमातून उभी राहिलेली जावळी सहकारी बँक यशस्वी ठरली. त्यामुळे येथील ह भ प दत्ता दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या गौरव निमित्त दत्तात्रय महाराज कळंबे जावळी बँक असे नामकरण केले. यासाठी संचालक डी. जी जाधव आग्रही होते. त्यांनाच श्री गुरु दत्तात्रय महाराज कळंबेसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
थोर सामाजिक कार्यकर्ते व समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांचे शिष्य असलेले हभप दत्तात्रय महाराज कळंबे यांनी अध्यात्मिक विचारांची शिदोरी आपल्या समर्थकांना दिली होती. त्यामध्ये जावळी बँकेचे संचालक ते चेअरमन पदाची मजल मारणारे डी. जी. जाधव म्हणजे जावळी बँकेचा इतिहास मानला जातो. त्यांना खऱ्या अर्थाने सेवा गौरव पुरस्कार देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला आहे.
.
श्रीगुरू दत्तात्रय महाराज कळंबे गुरूपूजन सोहळा माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिर मुंबई येथे अध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला आहे. सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर वै. श्रीगुरू दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रतिमेचे पूजन, श्री ज्ञानेश्वरी पारायण, नामयज्ञ् सोहळा व श्रीगुरू ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे सेवा गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी ह.भ.प. विकास महाराज भिलारे व ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांची कीर्तने झाली. देहूच्या गाथा मंदिराचे विश्वस्त ह.भ.प. श्री. शाम महाराज घुले यांनी काल्याचे कीर्तन संपन्न केले. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक लिमिटेड ही प्रामुख्याने कामगार वर्ग आणि माथाडी कामगारांच्या आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आली होती. यामध्ये अनेक मातब्बर मंडळींनी जावळी बँकेच्या प्रगतीसाठी खूप मोठे कष्ट घेतले आहेत. या बँकेची स्थापना १९ जुलै १९७३ रोजी झाली असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. यावेळी तरुणपणी डी. जी जाधव यांच्यासारख्या अनेकांनी बँकेच्या प्रगतीला हातभार लावला होता.

महाराजांचे परम शिष्य, डीएमके जावळी सह. बँकेचे माजी अध्यक्ष, पिंपरी गावचे सुपुत्र श्री. दत्तात्रय गेणू जाधव यांना ‘श्रीगुरू ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे सेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळेला अनेकांनी डी. जी. जाधव यांच्या कार्याचाही उल्लेख केला.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारी बँक युनियनचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री व माजी खा. आनंदराव अडसूळ, डी.एम.के. जावळी बँकेचे चेअरमन व संचालक चंद्रकांत दळवी, शिवाजीराव सुर्वे,राजेंद्र कळंबे, विजय कासुर्डे, राजेंद्र शेलार, चंद्रकांत गावडे, प्रकाश मस्कर, संतोष कळंबे, राजाराम ओंबळे, विश्वनाथ धनावडे, निवृत्ती चिकणे,दत्ता कळंबे, राजाराम परामणे, महादेव वाडकर, विजय पार्टे , संदीप शेलार, विकास जाधव, प्रदीप कळंबे, विजय जाधव, संदीप धनावडे, दिपक सकपाळ, विशाल गावडे,अजित कळंबे, आनंदराव गोळे, बँकेचे सर्व संचालक आणि महाराजांचे शिष्य, अनुयायी, भक्त मंडळी, बँकेचे अधिकारी ठेवीदार व कर्मचारी, हितचिंतक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी गौरवशाली बाब आहे . ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली जावळी बँक प्रगतीपथावर घेऊन जाण्यास यश मिळाले आहे. जुन्या व अनुभवी संचालकांची आठवण ठेवल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक लिमिटेड ही प्रामुख्याने कामगार वर्ग आणि माथाडी कामगारांच्या आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आली होती. यामध्ये अनेक मातब्बर मंडळींनी जावळी बँकेच्या प्रगतीसाठी खूप मोठे कष्ट घेतले आहेत. दरम्यान ,या बँकेची स्थापना १९ जुलै १९७३ रोजी झाली असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. याबाबत अनेकांनी आठवण करून दिली आहे. सध्या जावळी बँकेच्या संचालक निवडणुकीसाठी हालचाल सुरू झालेली आहे. या वेळेला सभासद काय भूमिका घेतात? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

————————————————-

फोटो ह भ प दत्तात्रय महाराज सेवा गौरव पुरस्कार प्रदान करताना मान्यवर (छाया- अजित जगताप, मुंबई)

Scroll to Top