ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

तापोळ्यात विकासाची झेप : सरपंच रमेश धनावडे यांना राज्यस्तरीय  ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार जाहीर

तापोळा (नितीन गायकवाड) : तापोळा वाणवली तर्फे सोळशी ग्रुप ग्रामपंचायत आदर्श सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते धडाकेबाज तरुण तडफदार व्यक्तिमत्व रमेश धनावडे यांना यंदाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला असून तो मान्यवरांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.

त्यांच्या कार्याची सुरुवात ११ नोव्हेंबर २०२२ रोजी लोकनियुक्त सरपंच म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रमेश शंकर धनावडे यांनी विकासकामांचा धडाका लावत तापोळा परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पदभार स्वीकारताच ग्रामपंचायत कार्यालयाची दुरुस्ती करून ते जनतेसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर कार्यालयासमोरील मैदानाचे कॉंक्रिटीकरण, ग्रामसचिवालय नवीन इमारतीचा प्रस्ताव व गावठाण प्रस्ताव प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आला.

पाणीटंचाई दूर करण्यासाठी सोळशी नदी पात्रात विहीर खोदून उन्हाळ्यातील गंभीर प्रश्न मार्गी लावण्यात आला तसेच जलजीवन योजनेतून पाणी फिल्टर व्यवस्था सुरू झाली. शिवसागर बोट क्लब ते नाका रस्ता, शंकर मंदिर मागील रस्ता, सिद्धार्थनगर बंदिस्त गटार व रस्ता तसेच सातारा जिल्हा बँक ते पद्मावती मंदिर बाजारपेठ रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण किंवा सुरू झाली आहेत. विशाल बोट क्लब ते १०५ गाव जिल्हा परिषद रस्ता खुला करण्यात आला असून बोट क्लब येथे नवीन घाटाचे बांधकाम सुरू आहे.
शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत नव्याने बांधण्यात आली, प्राथमिक शाळेची दुरुस्ती करण्यात आली तसेच महाबळेश्वर तालुक्यातील एकमेव आदर्श शाळेचे बांधकाम सुरू आहे. वानवली अहिरे येथे सभा मंडप सुशोभीकरण व प्राथमिक आरोग्य केंद्र संरक्षण भिंतीचे कामही सुरू आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार रमेश धनावडे यांना जाहीर झाला असून २८ फेब्रुवारी रोजी कोपरखैरणे, नवी मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
Scroll to Top