Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रविवेकी नेतृत्व➖ मा.श्री बाबुरावदादा संकपाळ

विवेकी नेतृत्व➖ मा.श्री बाबुरावदादा संकपाळ


मा. श्री बाबुरावदादा संकपाळ हे सातारा जिल्ह्यातील जावली – महाबळेश्वरच्या राजकारणातील दिपस्तंभ आहेत. त्यांनी राजकारणाला सेवेचे माध्यम मानले आहे. राजकारण आणि नितिमत्ता एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या, म्हणूनच श्री बाबुरावदादा संकपाळ यांना तालुक्याच्या राजकारणील स्तंभ म्हणून ओळखले जाते .
सत्तेच्या माध्यमातून जनसामांन्याचे हित करता येते, हा दादांच्या राजकीय प्रवासाचा मुख्य पैलू आहे.
लाखवड गावचे सरपंच ते सातारा जिल्हा परिषद सदस्य असा यशस्वी राजकीय प्रवास करीत असताना प्रत्येक पदाचे त्यांनी सोने केले. नेतृत्वाने पद प्राप्त केल्यानंतर पदाचे महत्व वाढते, अशा राजकीय नेत्यांपैकीच आपले बाबुरावदादा हे आहेत.
जावली – महाबळेश्वरची भूमी तर सदैव स्वातंत्र्य सेनानी कै. भिलारे गुरुजी कै. डी . बी . कदम, कै.जी.जी. कदम (अण्णा ) या माजी आमदारांच्या ऋणात राहील. त्यांच्या सारख्यांच्या आशिर्वादाने व मार्गदर्शनाखाली जावली महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी बाबुरावदादांनी वसा घेतला . आणि त्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मा. जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शशिकांतजी शिंदे साहेब, वाई – महाबळेश्वर – खंडाळा विधानसभेचे आमदार मा. मकरंद आबा पाटील तसेच महाबळेश्वर तालुक्याचे विकासरत्न स्व. बाळासाहेब भिलारेदादा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने त्यांचे अथक परिश्रम सुरूच आहेत व सुरूच राहतील . बाबुरावदादा हे सोळशी विभागाचे भगिरथ, भाग्यविधातेच आहेत. जावली महाबळेश्वरला बाबुरावदादा यांच्या रुपाने उत्तुंग व्यक्तिमत्त्व विचार आणि कर्तृत्व असिम उंची तसेच निष्कलंक चारित्र्य जीवन असलेले नेतृत्व मिळाले आहे हे आपले भाग्य आहे.
श्री बाबुरावदादा संकपाळ यांच्यासारखे विकासभिमुख व अभ्यासू नेतृत्व लाभले. त्यांनी तालुक्यात ग्रामीण भागात कार्यकर्ते तयार करून त्यांच्या सहकार्याने व विचार विनिमय करून आवश्यक त्या योजना गावागावात पोच करण्याचे व त्या योग्य त्या मार्गाने राबविण्याचे कार्य त्यांनी केले आहे व पुढे करत आहेत.
जावली तालुका हा इतिहासमय तालुक असून याच जावली तालुक्याचे नेतृत्व करण्याचा संधी बाबुरावदादांना मिळाली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर .
तालुका अध्यक्षाच्या कालावधीत दादांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध युक्त्या / प्रयुक्त्या वापरून त्यावेळेस तालुक्यात एक नंबरचा पक्ष म्हणून लौकिक केला . तद्नंतर जावलीचे आमदार मा. शशिकांतजी शिंदे साहेब यांनी दादांवर जिल्ह्याची जबाबदारी देण्याचे ठरविले त्याअनुषंगाने दादांनी जिल्हा परिषद सदस्य पोट निवडणूक लढविली . जनतेने प्रचंड बहुमतांनी दादांना जिल्हा परिषदेवर पाठविले व त्यांच्या कार्याची पोच दिली . त्या प्रसंगी आ. शशिकांत शिंदे आपल्या भाषणात म्हणाले➖ ” बाबुरावदादांसारखा ग्रामीण भागात राहणारा साधा एक शेतकरी कशाचीही अपेक्षा न करता आजपर्यंत समाजसेवा करत आला त्याचीच प्रेमाची व आपुलकीची पोच पावती या ग्रामीण भागातील जनतेने आज दाखवून दिली . ” मला पहिल्या पंचवार्षिकला जावलीचा आमदार बनविण्यामध्ये बाबूरावदादांनी केलेली धडपड आणि त्यामध्ये मिळालेले यश हे माझे भाग्य समजतो . असे गौरवोद्गार मा. जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे साहेब यांनी त्या वेळेस मेढा येथील विजयी मिरवणूकीत जाहिर सभेत काढले .
सन २०१० मध्ये तांत्रिकदृष्टया जावळी विधानसभा मतदारसंघ केंद्र शासन स्तरावरुन कमी करण्यात आला व जावळी तालुक्याचे सातारा – वाई – महाबळेश्वर अशा तीन तालुक्यांमध्ये विभाजन करण्यात आले . त्यामध्ये सोळशी कोयना व कांदाटी विभागातील वाकी ते बामणोली भाग वगळता ५६ गावे महाबळेश्वर तालुक्यात समाविष्ट झाली . जावली तालुक्यात तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर असणाऱ्या विविध समित्या व उपसमित्या यांच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील नागरीकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाबुरावदादांनी केला .
सुक्ष्म अभ्यास, तल्लख बुद्धी आणि प्रशासनावरील मजबुत पकड यामुळे वरिष्ठांकडून त्यांना महाबळेश्वर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून आजपर्यंत संधी दिली गेली . महाबळेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीची तोफ म्हणून बाबुराव दादांना संबोधण्यात येऊ लागले त्याचे कारण म्हणजे परखड मत मतांतराद्वारे भाषणातून विचार मांडणे . महाबळेश्वरमध्ये कार्यरत झाल्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातील त्यांनी नवे आणि जावलीचे असणारे जुने कार्यकर्ते यांची सांगड अत्यंत संयमाने त्यांनी घातली . एकीकडे जावलीचे काही प्रश्न आणि विगतवारी असताना बाबुरावदादांनी नेहमी ग्रामीण भागाच्या विकासासाठी पुढाकार घेतला .
जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी अनेक निर्णय घेताना आपल्या आगळ्या – वेगळ्या व्यक्तीमत्वाची चुणूक जावली / महाबळेश्वरच्या जनतेला दाखवून दिली . साताऱ्यात त्यांना राहण्याकरिता स्वतः ची जागा देखील नव्हती . इतकी तत्वनिष्ठा त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यामध्ये जोपासली . व्यक्तीगत हिताचे निर्णय त्यांनी कटाक्षाने टाळले . समुहाच्या हिताचे निर्णय घेण्यावर त्यांचा भर होता . १९६९ ची मॅट्रीक असलेले बाबुरावदादा हे कुशाग्र बुद्धीमत्तेचे नेते म्हणून ओळखले जातात . प्रशसकिय कर्मचारी / अधिकारी यांच्या कामकाजाच्या बाबतीत दादांचा प्रशासकीय पातळीवर दरारा आहे. आयुष्यात त्यांनी राजकीय तडजोड करताना तत्वनिष्ठपणा सोडला नाही , भले त्यांना एखादे पद मिळाले नसेल परंतु आपली भूमिका त्यांनी कधीच बदलली नाही .
२००६ मध्ये ५६ गावे महाबळेश्वर तालुक्यात विलिन झाल्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी वेळी तेढ निर्माण झाली, परंतु बाबुरावदादांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या हक्काच्या मतदारसंघात वरिष्ठांच्या आदेशानुसार स्व. बाळासाहेब भिलारेदादांना ZP आणि अमितदादा कदम यांना पंचायत समितीचे सदस्य पदाच्या उमेदवारीकरिता बाबुरावदादांनी मोठे मन तर दाखविलेच पण या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडूण आणण्यात बाबुराव संकपाळ यांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही .
घरातील सामान्य आर्थिक परिस्थिती असताना समाजासाठी ध्येयवेडे असणाऱ्या श्री बाबुरावदादा संकपाळ यांना महाराष्ट्र राज्याचे मा.जल संपदा मंत्री नामदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचे आणि वाई – महाबळेश्वर – खंडाळा विधानसभेचे आमदार मा. मकरंदआबा पाटील त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते स्व. बाळासाहेबदादा भिलारे यांच्या सारख्या थोर नेत्यांचे सहकार्य त्यांना मोलाचे ठरले .
सर्वांच्या सहकार्याबरोबरच तमाम जनतेच्या प्रेरणेने जावली महाबळेश्वर मधील कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी विविध विकास कामांच्या योजना राबविण्यासाठी त्यांच्या भावी कार्यास पदोपदी यश मिळो, हिच वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
🎂🎂💐💐
शब्दांकन
श्री रमेश तानाजी संकपाळ
अध्यक्ष – सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था नवी मुंबई
सचिव :- महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान नवी मुंबई

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments