Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रस्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार देण्यात येतो. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्य प्रकारांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ग्रंथ देवून गौरविण्यात येते. सदर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. यासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे यांनी केले आहे.
सन 2023 व 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्य कलाकृती यासाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, चारोळीसंग्रह, कादंबरी, समीक्षा, वैचारिक लेखन, चरित्र, आत्मचरित्र व संकीर्ण विभागातील साहित्य कलाकृतींचा समावेश केला जाईल. पुरस्कारासाठी प्रस्तावासोबत आपल्या साहित्य कलाकृतीच्या तीन प्रती, दोन आयडेंटी फोटो, अल्प परिचय पाठवावा. पाठवलेल्या पुस्तकावर कोणत्याही प्रकारचा मजूकर लिहू नये.
पुरस्कारासाठी अधिकृतरित्या आलेल्या साहित्य कलाकृतीमधूनच पुरस्कारांसाठी पुस्तकांची निवड केली जाणार आहे. स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार निवडीसाठी स्वतंत्र परीक्षक समिती नेमली आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यामध्ये भाग घेण्यासाठी पुस्तकाच्या तीन प्रती पाठवाव्यात. या निमित्ताने संग्रहित झालेल्या तीन पुस्तकांपैकी दोन प्रती वाचनालयाला भेट देण्यात येणार असून एक प्रत ‘पुस्तकांचं झाड’ या उपक्रमासाठी ठेवण्यात येणार आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने यापूर्वी वाचन चळवळ समृध्द करण्यासाठी पुस्तकांचं झाड, दिवाळी अंक स्पर्धा, उत्कृष्ट वार्तांकन स्पर्धा, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, वाचनालयास दिवाळी अंक वितरण आणि पुस्तकांनी मान्यवरांचे स्वागत इ.उपक्रम राबवले आहेत. याषिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
तरी स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासाठी शनिवार दि.30 जून, 2024 पर्यंत ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124 येथे पोस्टाने अथवा कुरियरने आपल्या साहित्य कलाकृती पाठवाव्यात असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments