मुंबई(रमेश औताडे) : म्हातारपण हे कधीही एकाकी किंवा दडपून टाकणारे असू नये. प्रत्येक ज्येष्ठ माणूस समजूतदार, विश्वासाहर्य आणि सहज मिळणारी देखभाल मिळवण्यास पात्र आहे. त्यांना आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे जगण्यास आधार मिळावा असे मत जेन एस लाईफ च्या संस्थापक मीनाक्षी मेनन यांनी व्यक्त केले.
भारताचे पहिले ज्येष्ठांसाठी लाइफस्टाइल ॲप जेन एस लाईफ ने आयुष्याच्या संध्याकाळच्या टप्प्यावर असणाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. आरोग्य आणि आनंददायी नेटवर्क संस्थेने या माध्यमातून उभे केले असल्याने ज्येष्ठ मंडळी मेट्रोपोलिस, टाटा , शुगर फिट, अन्वया, रेड हेल्थ आणि फार्मा ईझी सारख्या आरोग्य सोबतीवर विश्वास ठेवू शकतात. आजाराच्या निदानापासून ते दिर्घ काळ असणाऱ्या आजारांवर सुविधा व भावनिक आधाराच्या यामधून ज्येष्ठांना मिळणार आहेत.




