मुंबई(रमेश औताडे) : मेक-इन-इंडिया उपक्रमांतर्गत विकसित झालेली क्लाऊड-आधारित रेस्टॉरंट टेक्नॉलॉजी असणारी कंपनी ” सपाड ” ने भारतीय बाजारात अधिकृत प्रवेश केला आहे. ४० हून अधिक देशांतील हजारो ग्राहकांसह दशकभराचा अनुभव असलेली ही पूर्णपणे बूटस्ट्रॅप्ड कंपनी, भारतातील वेगाने डिजिटल होत असलेल्या फूड सर्व्हिस सेक्टरसाठी स्मार्ट व स्केलेबल उपाय देणार असल्याची माहिती कंपनीचे संस्थापक विष्णु वर्धन यांनी सांगितले .
२०३० सालापर्यंत संगठित रेस्टॉरंट टेक्नॉलॉजी मार्केटमधील ८ ते १० टक्के हिस्सा मिळवण्याचे सपाड कंपनीचे लक्ष्य आहे. देशातील लाख टेक्नॉलॉजी-रेडी फूड आउटलेट्सपैकी सुमारे ५० हजार रेस्टॉरंट्स हे कंपनीसाठी संभाव्य बाजार आहेत. कीव्ह एस आर चेन, फ्रँचायझी ब्रँड्स, कॅफे, बेकरी, क्लाऊड किचन आणि मध्यम आकाराच्या रेस्टॉरंट ग्रुप्सवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे असे सपाडच्या सी टी ओ अनुप एंथनी यांचे सांगितले.



