Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रचला आपल्या मस्तीत जगू या ! आयुष्याची संध्याकाळ मजेत घालवू या !!...

चला आपल्या मस्तीत जगू या ! आयुष्याची संध्याकाळ मजेत घालवू या !! महापालिकेच्या सेवानिवृत्तांचे स्नेहसंमेलन प्रचंड उत्साहात संपन्न


प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचे प्रथम स्नेहसंमेलन श्री.संजय मोरे, श्री. विजय पाताडे, मधुकर आंबोणकर, विवेक गांवकर, ज्ञानदेव कदम, सुहास खामकर, संजय वारीक, रवी मोरे, प्रकाश मोरये, पेडामकर,भोई, तांडेल, भूवड,बंगेरा व मित्र मंडळींच्या एकूण 14 जणांच्या चमूच्या सहभागाने नुकतेच पय्याडे इंटरनॅशनल हॉटेल, कांदिवली पश्चिम येथे संपन्न झाले. या कार्यक्रमास सर्वांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा सेवानिवृत्तांना एकत्र आणण्याचा असल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रम थोडक्या वेळात सादर करण्यात आले. यात सेवानिवृत्तांनीच कराओकेवर गाणी म्हटली. त्याचप्रमाणे कविता वाचन, मिमिक्री यांचीही कार्यक्रमादरम्यान पखरण करण्यात आली. गाण्यांच्या तालावर आपले वय,आपल्या व्याधी,आपल्या समस्या सर्व काही विसरून सेवानिवृत्त थिरकले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जात होता. कार्यक्रम समाप्तीनंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत घेत सेवानिवृतांनी एकमेकांशी बोलावे या उद्देशाने जास्तीत जास्त वेळ हा गप्पाटप्पांसाठी देण्यात आला होता. कित्येक सहकारी गेल्या कित्येक वर्षात एकमेकांना भेटलेले नसल्याने त्यांच्यासाठी ही पर्वणी होती. स्नेहसंमेलन निवृत्त नव-तरुणांचे अशी संकल्पना असलेले हे स्नेहसंमेलन उत्तरोत्तर रंगतदार होत पुढील कार्यक्रमाबद्दलच्या अपेक्षा ठेवून संपन्न झाले.

RELATED ARTICLES

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments