प्रतिनिधी : उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील सकल मराठा समाजाने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. कुर्ला पश्चिम श्री कच्छीविसा सभागृहात सकल मराठा समाजाने जाहीर सभा आयोजित केली होती. प्रो. वर्षा गायकवाड यांनी आश्वासन दिले की मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय संसदेत प्रभावीपणे मांडून मराठा समाजाला न्याय मिळवून नक्की देणार.
या सभेत डॉ महेश पेडणेकर कमलाकर नाईक, दिलीप सराटे मास्टर, नंदकुमार जाधव, गणेश चिकणे, कमलाकर बने, विजय मांढरे, दिलीप शिंदे, संदीप जाधव, मानसिंग कापसे, दिलीप मोरे, बाबुराव मोरे, शशांक नाईक, प्रकाश कांडरकर आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले, अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या, मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले तरीही संवेदनशून्य शिंदे-भाजपा सरकारला पाझर फुटला नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय संसदेत प्रभावीपणे मांडून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा सर्व वक्त्यांनी व्यक्त केली.
सकल मराठा समाजाने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात जनतेशी संपर्क करत वर्षा ताई गायकवाड यांना प्रचंड मताने जिंकून देण्यासाठी आवाहन केले.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज वांद्रे पूर्व भागात महामार्ग शाखा ते चैतन्य नगर आणि शांतीनगर सहार गाव ते विलेपार्ले पोलीस स्टेशन अशी जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. या जनसंवाद यात्रेला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.