Tuesday, October 28, 2025
घरमहाराष्ट्रधामणीमध्ये सेवानिवृत्त सैनिकांची जंगी मिरवणूक व स्वागत

धामणीमध्ये सेवानिवृत्त सैनिकांची जंगी मिरवणूक व स्वागत

प्रतिनिधी : धामणी, ता – पाटण , जि- सातारा येथील सेवानिवृत नायक सुभेदार श्री . रविंद्र शामराव लोकरे यांचा सेवानिवृत्ती सोहळा जंगी मिरवणुक काढून मोठया आनंदात , उत्साहात , दिमाखात साजरा करण्यात आला .
धामणी गावचे सुपुत्र श्री रविंद्र शामराव लोकरे हे भारतीय सैन्य दलातून देशाची २४ वर्षाची प्रदीर्घ पुर्ण सेवा करून २४ ऑक्टोंबर ला धामणी गावामध्ये आले .
२१ सप्टेंबर २००१ ला सैन्यात भरती झालेपासुन आपल्या सेवाकाळात भारतातील सीमारेषा सुरक्षित ठेवण्याचा मोठया जोखमीचे कर्तव्य यशस्वीरित्या पुर्ण केले .युनिट २१६ मध्यम तोफखाना मधून सुरुवातीचे तोफखाना गनचे १० महिन्याने ट्रेनिंग हैद्राबाद , नाशिक येथे घेतले .
त्यानंतर अरुणाचल प्रदेश टेंगा तवांग चायना बॉर्डर , कुपवाडा, पठ्ठण बारामुल्ला जम्मू काश्मीर , पंजाब पटियाला , कारगिल द्रास सेक्टर , भुसावळ महाराष्ट्र , दुग्रुमुल्ला जम्मु काश्मीर , हरितकोट पंजाब , नाशिक याठिकाणी भारतभूमीची २४ वर्षाची प्रदिर्घ सेवा केली .देश हाक मारेल तिथं धावून जाऊन देशातील कानाकोपऱ्यात प्रतिकुल परिस्थितीत विविध ऑपरेशन्स मध्ये सहभाग नोंदवून आपली जबाबदारी मोठया नेटाने पार पाडली . त्यांनी चायना , बांगलादेश व पाकिस्तान तिन्ही सिमेवर काम केलेले आहे .
अशा या लढवय्या भारताच्या सुपुत्राचे धामणी गावामध्ये 24 ऑक्टोंबर रोजी आगमन होणार म्हणून गावातील समस्त ग्रामस्थ, मित्रपरिवार ,नातेवाईक ,आप्तेष्ट, हितचिंतक यांनी रथातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून ठिकठिकाणी प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत भराडी मातेचे दर्शन घेऊन घरी कार्यक्रम स्थळी प्रस्थान केले .
यावेळी वडील शामराव लोकरे ,भाऊ भरत लोकरे ,दिलीप लोकरे, पत्नी अश्विनी लोकरे , मुलगा सचिन , मुलगी अनुष्का , सासु – सासरे,विद्यमान सरपंच सौ शीतल पाटील, उपसरपंच अविनाश गुरव ,श्री आनंदराव पाटील संचालक रयत सहकारी कारखाना म्हासोली, माजी सरपंच बबन सावंत ,माजी सरपंच आशाताई नेर्लेकर , रोहित तडक , राहुल लोकरे , चेतन लोकरे , गजानन रैनाक , शरद जाधव , अशोक शिद्रुक, मोठ्या संख्येने माजी सैनिक सुनील चिंचोलकर ,शशिकांत गुरव, प्रवीण पुजारी ,सतीश पाटील, दिनकर शेळके, दिलीप खोत, निलेश सूर्यवंशी ,गोपीनाथ रसाळ, मानसिंग पवार ,महेश भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
याप्रसंगी त्यांची आई आक्काताई लोकरे ,प्रकाश कुलकर्णी , सौ .स्वाती सावंत, प्रा . धनराज आमटे, सुभाष चव्हाण ,फौजी जालिंदर येळवे यांनी मनोगत व्यक्त केले तर शिवसमर्थ धामणी संस्थेचे व्यवस्थापक सुनील पवार यांनी सूत्रसंचालन व आबासो दिंडे महाराज यांनी आभार मानले .

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments