वाई(नितीन गायकवाड) : सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतनगर गटातून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे जिल्हा उपजिल्हाप्रमुख वाई पंचक्रोशीतील लोकप्रिय नेतृत्व मा. श्री. विकास अण्णा शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विकास अण्णा शिंदे हे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांचे कट्टर समर्थक असून पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे निष्ठावंत व कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. अन्यायाला वाचा फोडणारा व सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून त्यांची प्रतिमा वाई पंचक्रोशीत दृढ आहे.
सातारा येथे नुकत्याच झालेल्या शिवसेना मेळाव्यात नामदार एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या मेळाव्यात विकास अण्णा शिंदे यांनी सांगितले की,
“शिवसेनेचे विचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेत जात आहोत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक यशस्वी होईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
या घोषणेनंतर वाई पंचक्रोशीत सर्वत्र शिवसेनेचा झेंडा फडकला, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत विकास अण्णा शिंदे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले.