प्रतिनिधी : महानगरपालिकेकडून मुंबईतील कबुतरखाने बंद केल्याच्या निर्णयामुळे हजारो कबुतरांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेला अहिंसेच्या आणि करुणेच्या मूल्यांवर आघात मानत समाजाने सरकारला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर कबुतरांना वाचवा : मनःशांती साठी एक विशाल धार्मिक बैठक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता योगी सभागृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत महावीर मिशन ट्रस्टचे संस्थापक व प्रसिद्ध गोरक्षक राष्ट्रीय संत मुनी नीलेश चंद्र विजयजी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सुरेश पुनमिया, राकेश कोठारिया यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुनी नीलेश चंद्र विजयजी म्हणाले,
“कबुतरखाना बंद केल्यामुळे अनेक निष्पाप कबुतरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना करुणा, अहिंसा आणि जीवनाच्या पवित्रतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. प्राणिमात्रांवरील दयेचा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या समाजावर अन्याय होत आहे. सरकारने तातडीने या विषयाची दखल घेऊन कबुतरखाने पुन्हा सुरू करावेत.”
या धर्मसभेत सकल जैन समाज, राजस्थानी छत्तीस कोम, महावीर मिशन ट्रस्ट, शेरी अँड दिया फाउंडेशन, कुलाबा सकल जैन संघ, जैन आंतरराष्ट्रीय सेवा संघटना (JISO) फाउंडेशन आणि इतर अनेक धार्मिक संस्था व संत उपस्थित राहणार आहेत.
मुनी नीलेश चंद्र विजयजी यांनी स्पष्ट इशारा दिला की,
“जर या बैठकीनंतरही सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर दिवाळीनंतर आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात येईल.