मुंबई (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) : शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच आमदार, शिवसेना सचिव, प्रवक्ते व राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री. किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कामगार सेना (उ.बा.ठा) गटातील कुलाबा, घाटकोपर व मजास आगारातील सभासद व पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब भवन येथे दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेनेत मोठ्या संख्येने प्रवेश केला.यावेळी कामगारांनी मागील तीन वर्षांपासून मिळालेल्या भरघोस बोनसचे श्रेय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व राष्ट्रीय कर्मचारी सेनेला दिले तसेच त्यांचे आभार मानले.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. किरण पावसकर यांनी सांगितले की बेस्ट कामगारांचा मेळावा लवकरच आयोजित करण्यात येईल. या मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कामगारांना मार्गदर्शन करतील.या प्रसंगी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे बेस्ट युनिट अध्यक्ष श्री. किसन वाळुंज, सरचिटणीस श्री. किरण साळुंखे, कोर कमिटीचे पदाधिकारी, चिटणीस श्री. सचिन लिमन तसेच बेस्टचे अनेक कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेस्ट कामगार सेना (उ.बा.ठा) गटातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय कर्मचारी सेनेत मोठ्या संख्येने प्रवेश
RELATED ARTICLES