मुंबई(भीमराव धुळप) : “आम्ही सातारकर” विकास प्रतिष्ठान, मुंबई तर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सातारावासियांचे स्नेहसंमेलन तसेच “सातारा रत्न-भूषण पुरस्कार वितरण सोहळा २०२५” मोठ्या उत्साहात बुधवार १ आक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत, राष्ट्रीय मिल मजदूर संघ हॉल, मजदूर मंझिल, जी.डी. आंबेकर रोड, भोईवाडा, परळ, मुंबई – ४०००१२ येथे पार पडणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय विजयादशमीचे पारंपरिक सोने वाटप कार्यक्रम देखील होणार असून, सर्व सातारावासी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांत राजमुद्रा प्रस्तुत ‘गौरव महाराष्ट्राचा’ हे विशेष सादरीकरण होणार आहे. “आम्ही सातारकर” विकास प्रतिष्ठान, मुंबईतर्फे सर्वांना आवर्जून सहभागी राहण्याचे सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.
मुंबईत “आम्ही सातारकर” विकास प्रतिष्ठानचा १ आक्टोबर रोजी दसरा मेळावा
RELATED ARTICLES