मुंबई (मोहन कदम) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहर पासून जवळच असलेल्या मु. पो. कासार कोळवण गावातील कांडकरी विकास मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. दिलीप तोरस्कर सर व नितीन तोरस्कर यांचे वडील शांताराम बा. तोरस्कर यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आम्ही सर्व जण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत त्यांना व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना हे दु:ख सावरण्याचे ईश्वर बळ देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करत संघर्ष विकास समिती. कांडकरी विकास मंडळ,श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ, नवतरुण मित्र मंडळ,द्रोणागिरी ना.नि.प. गृहनिर्माण संस्था व तोरस्कर बंधू परिवार व समस्त कासार कोळवण ग्रामस्थ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.त्याचे उत्तर कार्य बारावे- तेरावे कार्यविधी शुक्रवार दिनांक १९/९/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता ६७,डी १५ द्रोणागिरी नागरी निवारा सोसायटी, नागरी निवारा परिषद झोन २, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग गोरेगाव पूर्व मुंबई ६५ येथे निवासस्थानी होणार आहे.
शांताराम बाबाजी तोरस्कर यांचे दुःखद निधन
RELATED ARTICLES