प्रतिनिधी : कलासाधना सामाजिक संस्था – नवी मुंबई तर्फे शिक्षक दिनानिमित्त ‘ परमपूज्य साने गुरुजी समाज भूषण पुरस्कार ‘ घणसोली – नवी मुंबई येथील सुलेखनकार विलास खंडेराव समेळ यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र , स्मृतीचिन्ह , पदक , नॅपकीन बुके आणि श्यामची आई हे पुस्तक देऊन प्रदान करण्यात आला.
नवी मुंबई येथील कलासाधना या सेवाभावी समाजिक संस्थेच्या वतीने शिक्षकदिनानिमित संस्थेला महाराष्ट्रातून ८३० अर्ज प्राप्त झाले होते त्यातील ५० विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली होती . संस्थेच्या अध्यक्षा सौ.मेघा महाजन उपाध्यक्ष श्रीराम महाजन आणि इतर सदस्यांच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा कराडी समाज हॉल कामोठे – नवी मुंबई येथे रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनघा जगताप यांनी केले .
_____________________________________
सुलेखनकार विलास समेळ यांना राष्ट्रस्तरीय ‘ समाज भूषण पुरस्कार ‘
RELATED ARTICLES