Tuesday, September 9, 2025
घरमहाराष्ट्रभांडवलदारांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सहकारी संस्था स्थापन झाल्या -- ॲड उदयसिंह पाटील

भांडवलदारांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सहकारी संस्था स्थापन झाल्या — ॲड उदयसिंह पाटील

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड कराड. 88 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिपादन. संस्थेच्या वतीने सभासदांना 15% लाभांश) कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. कराड. सन 2024-25 सालाची 88 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन अनिल राव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कराड तालुक्यातील शिखर संस्थांचे मार्गदर्शक व रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील -उंडाळकर.शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, श्री. के टी. पाटील चेअरमन कोयना बँक, श्री शहाजी शेवाळे चेअरमन स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील ना.सह. पतसंस्था.,प्रा. धनाजी काटकर, मा. जि. प.सदस्य प्रदीप पाटील उपस्थित होते. .. यावेळी बोलताना एॅड उदयसिंह पाटील उंडाळकर म्हणाले, भांडवलदारांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी 1937 साली कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना झाली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून सहकाराला बळकटी प्राप्त झाली, स्वर्गीय लोकनेते विलास काकांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने संघाची चौफेर प्रगती झाली. काकांनी लावून दिलेली शिस्त आज ही काटेकोरपणे पालन केली असलेने महाराष्ट्रामध्ये संघाने नावलौकिक मिळवला आहे. सध्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान देणे आवश्यक असून त्यादृष्टीने संघाचा प्रयत्न चालू आहे. संस्थेच्या शाखेमधून शेती अवजारे, शेती औषधे, बी- बियाणे रासायनिक खते व संघाच्या डिझेल- पेट्रोल पंपावरून तेल खरेदी करून संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांनी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे चेअरमन अनिल राव मोहिते यांनी सन 2024- 25 साला मधील लेखाजोखा मांडला संस्थेने 68 कोटी एवढी उलाढाल करून, व्यापारी नफा 1कोटी 87 लाख मिळवलेला आहे. सर्व तरतुदी वजा जाता निवळ नफा 12 लाख झाला आहे. यावर्षी सभासदांना 15 टक्के लाभांश दिला जाणार असे जाहीर केले. यावेळी प्राध्यापक धनाजी काटकर सर यांनी मनोगत व्यक्त केले. नोटीस वाचन– सरव्यवस्थापक शशिकांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन –जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले. श्रद्धांजली ठराव– संचालक प्रताप कणसे यांनी मांडला. . आभार– जगनाथ मोरे यांनी मानले. यावेळी जेष्ठ संचालक हणमंतराव चव्हाण, रंगराव थोरात, श्रीमंत काटकर, आत्माराम जाधव, उत्तम जगताप, बाजीराव पाटील, कैलास साळवे, यशवंत डुबल, मच्छिंद्र बानुगडे, महेश पाटणकर, दिलीप भिसे, किसन चव्हाण. उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments