प्रतिनिधी(भीमराव धुळप) : जन प्रतिष्ठान, लातूरतर्फे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर ७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६:४५ ते ९ या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, दादर (प.) मुंबई येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात भाजपचे राष्ट्रीय महामंत्री सुनिल बन्सल, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश आणि ज्येष्ठ वकील वैभव जोगळेकर उपस्थित राहणार आहेत.
एकाचवेळी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका घेण्याचे प्रशासनिक, आर्थिक आणि राजकीय फायदे यावर चर्चा होईल.
मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सचिव अँड. विवेकानंद उजळंबकर यांनी पत्रकार परिषदेत केले.