मुंबई (शांताराम गुडेकर) : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून पंचरत्न मित्र मंडळ, युथ कौन्सिल चेंबूर आणि आरसीएफ कॉलनी बॉईज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर नुकतेच गंगाधर देशमुख सभागृह,आर.सी.एफ. कॉलनी, चेंबूर येथे पार पडले.पंचरत्न मित्र मंडळ, चेंबूर तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व कारगिल वीरांचा सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सोहळ्यात कारगिल युद्धातील वीर सैनिक व सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक फेडरेशन अध्यक्ष मान. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची उपस्थिती लाभली.तसेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर लिमिटेडचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री.निरंजन सोनक हेही उपस्थित होते.
पंचरत्न मित्र मंडळ गेली १८ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. रक्तदानासाठी नवी मुंबई ब्लड बँक व फोर्टीज हॉस्पिटल, वाशी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रममध्ये सैनिकांच्या अनुभवांचे भावस्पर्शी कथन,समाजासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार,रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू,
राष्ट्रीय कर्तव्य म्हणून रक्तदान करा…! या ब्रीदवाक्यच्या माध्यमातून १८६ बॉटल रक्त जमा करण्यात आले.त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आयोजकांतर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.मंडळ अध्यक्ष श्री. अशोक भोईर,सचिव श्री. प्रदीप गावंड,खजिनदार श्री.सचिन साळुंखे तसेच कार्यक्रम समिती सदस्य-राजू दळवी,डी.एफ. निंबाळकर, महेश बगाडे, स्नेहा नांदिवडेकर, सचिन इथापे, रहीम शेख, संतोष नाईक, पी.डी.भोसले, अशोक हुंडेकर, महेश गटाडे, कांदळगांवकर, सचिन पाटील, अतुल सावंत, विनोद उमरे, पुरु पाटसांवगीकर, निलम गावंड, अनिल गायकवाड, रुपाली नांदिवडेकर, सलीम अन्सारी, दिपक पाटील, वैभव घरत, रमेश पाटील, भाग्यश्री कापुरे, हनुमंता चव्हाण, सतिश कुंभार, छाया, प्रकाश शेजवळ, विनायक तरळ आदी मान्यवर मंडळी यांची विशेष उपस्थिती आणि योगदान लाभले.पंचरत्न मित्र मंडळ, युथ कौन्सिल चेंबूर आणि आरसीएफ कॉलनी बॉईज क्रीडा व सांस्कृतिक मंडळचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रम ची सांगता करण्यात आली.
पंचरत्न मित्र मंडळ, चेंबूर तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व कारगिल वीरांचा सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES