प्रतिनिधी : देवनार, आरसीएफ, गोवंडी, ट्रांबे आणि मानखुर्द पोलिस ठाण्यांमध्ये रक्षाबंधनाचा उत्सव महिला सेनेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्तव्य बजावत असतानाही नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतत तत्पर असलेल्या पोलिस बांधवांना राखी बांधून सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांना मिठाई वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन अणुशक्ती नगर विधानसभा महिला सेनेने केले होते. कार्यक्रमाला विभाग अध्यक्ष रविंद्र शेलार आणि विभाग अध्यक्षा अमिता गोरेगांवकर उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या या अनोख्या उपक्रमामुळे पोलिस व नागरिक यांच्यातील आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले.
मनसे महिला सेनेतर्फे पोलिसांसोबत रक्षाबंधन
RELATED ARTICLES