सातारा(संदीप डाकवे) : ग्रामपंचायत कसबे पाचवड ता. वाई जि. सातारा आणि महात्मा गांधी विद्यालय पाचवड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत स्तरीय ‘माझी वसुंधरा अभियान’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याप्रसंगी पाचवड गावचे सरपंच मा. श्री महेश गायकवाड ग्रामसेवक मा. श्री.कोळी साहेब, अमृतवाडी गावचे सरपंच मा. श्री. सचिन रत्नपरखी तसेच इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मुल्ला मॅडम, पर्यवेक्षिका सौ. तावरे मॅडम,, श्री. पवार, सौ. सोनावणे उपस्थित होते.गुरुकुल प्रमुख सौ. साधना पाटोळे यांनी विद्यालयातील विद्यार्थिनीं इको फ्रेंडली राख्या तयार करून घेऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थित झाडांना राख्या बांधून अनोखे वृक्षाबंधन साजरे केले वृक्षाप्रती आदर व्यक्त करून ‘माझा गाव माझा अभिमान’ उपक्रमात सहभाग नोंदवला.
झाडांना राख्या बांधून अनोखे वृक्षाबंधन
RELATED ARTICLES