मुंबई : लेखन, अध्यापन, शिक्षण आणि समाजकार्य या विविध क्षेत्रात ठसा उमटवणारे लेखक व कवी डॉ. मारुती नलावडे यांना ‘साप्ताहिक आम्ही मुंबईकर वृत्तपत्रातर्फे’ देण्यात येणारा ‘सांस्कृतिक व साहित्यरत्न पुरस्कार 2025’ नुकताच मुंबई येथे संपन्न झालेल्या पुरस्कार समारंभात प्रदान करण्यात आला.
‘अक्षरझेप’ या पुरस्कार प्राप्त काव्यसंग्रहाद्वारे साहित्य क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या डॉ. मारुती नलावडे यांची आजपर्यंत तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
*त्यांचा ‘अहो, खरंच ४८० टक्के!’ हा रसरशीत जिवंतपणा असलेला, सामाजिक प्रबोधनात्मक दीर्घकथासंग्रह मे 2024 मध्ये प्रकाशित झाला असून यावर्षी नुकताच ‘अक्षरकुंभ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
डॉ. मारुती नलावडे हे गेल्या सहा वर्षांपासून ‘बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशन’ या अग्रगण्य संस्थेचे कार्यवाह म्हणून ते धुरा सांभाळत आहेत.
त्यांनी महाराष्ट्रातील सुमारे 25000 शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दूरस्थ शिक्षण प्रणालीचा वापर करून ‘दर्जेदार शिक्षण’ या विषयावर ‘टेली कॉन्फरन्सिंगद्वारा प्रशिक्षणाचे’ यशस्वी आयोजन केलेले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘महापौर पुरस्कार’ तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘आदर्श शिक्षक राज्य पुरस्काराने’ही ते सन्मानित झालेले आहेत.
या बहुआयामी कार्यासाठी त्यांना ‘साप्ताहिक आम्ही मुंबईकर वृत्तपत्रातर्फे’ सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार समारंभाचे संयोजन मुख्य संपादक श्री. प्रमोद सूर्यवंशी व उपसंपादिका सौ. वसुधा नाईक यांनी केले.
डॉ. मारुती नलावडे यांचा ‘सांस्कृतिक व साहित्यरत्न पुरस्कार 2025’ ने गौरव*
RELATED ARTICLES