Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्र50% सवलतीत रेंजर सायकल व LED TV विक्री स्टॉलचे भव्य उद्घाटन उंडाळे...

50% सवलतीत रेंजर सायकल व LED TV विक्री स्टॉलचे भव्य उद्घाटन उंडाळे येथे संपन्न

प्रतिनिधी :

उंडाळे (ता. कराड) येथे 50% सवलतीच्या दरात रेंजर सायकल व अँड्रॉइड LED टीव्ही विक्री स्टॉलचे उद्घाटन भाजपा कराड दक्षिण मंडल अध्यक्ष मा. शंकरराव निकम (पंच), मा. राजेंद्र यादव (आबा), आणि मा. प्रविण साळुंखे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

हा उपक्रम कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सहकार्याने व भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा. पंकज पाटील (साळशिरंबे) यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला आहे. या उपक्रमात रेंजर सायकल तसेच 33 इंची ते 55 इंचीपर्यंतचे अँड्रॉइड LED TV ग्राहकांना 50% सवलतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा उपक्रम 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत चालणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमास मलकापूरचे पोलीस पाटील मा. प्रशांत गावडे, माजी नगरसेवक मा. शहाजी पाटील, सवादेचे माजी सरपंच मा. संजय शेवाळे, मालखेडचे उपसरपंच मा. युवराज पवार, जिंतीचे पोलीस पाटील मा. संतोष पाटील, मा. प्रशांत मोहिते (सरकार), मा. आण्णासो काशीद, मा. विलास मोहिते (नाना), मा. मंगेश पाटील, मनवचे उपसरपंच मा. दादासो शेवाळे, साळशिरंबेचे उपसरपंच मा. जयवंत यादव, मनव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मा. संताजी शेवाळे, घोगावचे उपसरपंच मा. निवास शेवाळे, हणमंतवाडीचे माजी सरपंच मा. रत्नाप्पा कुंभार तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा विक्री स्टॉल बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, उंडाळे येथे कार्यरत असून कराड दक्षिण व सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, महिला व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments