Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रलोकशाहीच्या तीन स्तंभांना वळन देण्याचे काम पत्रकार करतो-अमित सानप

लोकशाहीच्या तीन स्तंभांना वळन देण्याचे काम पत्रकार करतो-अमित सानप

मुंबई (शांताराम गुडेकर) :

भिवंडी तालुक्यातील स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भिवंडी पत्रकार महासंघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या सहकार्याने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील 100 पत्रकारांना रेनकोटचे वाटप कार्यक्रम सोमवार (दि. २१जुलै) ग्रामपंचायत कार्यालय वळ येथे पार पडला. यानिमित्ताने सर्व पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन देखील आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन कल्याणचे अध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोटिवेशन स्पीकर तथा जिल्हा माहिती अधिकारी ठाणे श्री.अमित सानप, वळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सचिन सत्यवान पाटील, ग्रामपंचायत अधिकारी श्री.राकेश जोशी,आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन कल्याण चे अध्यक्ष श्री.जितेंद्र पाटील, स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्रीमती संध्याताई पवार,राजेंद्र काबाडी, आचार्य सुरज पाल यादव,अबु बकार,अरुण मिश्रा,कुसूम देशमुख व मोठ्या संख्येने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते. पत्रकार ,जनता आणि शासन यांच्या मधला दुवा म्हणून जो काम करणारा अधिकारी असतो तो म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी होय. तहसीलदार ,प्रांत, एसीपी, डीसीपी, एसपी,ही पदे सर्वांना माहीत आहेत. परंतु जिल्हा माहिती अधिकारी हे पद बऱ्याच जणांना माहित नाही. हे राजपत्रित वर्ग एकचे पद आहे ते एमपीएससी कडून भरले जाते.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ.हे समजून घेणे मुख्य तीन स्तंभ आहेत कार्यपालिका ,विधिमंडळ व न्यायपालिका त्यामुळे समाजाच्या जडणघडणीमध्ये, समाज सुधारणेमध्ये ,समाजाच्या विकासामध्ये पत्रकार म्हणून विचार स्वातंत्र्याच्या आधारावर जे आपलं मत व्यक्त केलं जातं त्या मताला सुद्धा प्रचंड महत्त्व आहे ते या तीन स्तंभाइतकच आहे.कार्यपालिका, विधिमंडळ व न्यायपालिका या सगळ्यांना एकत्रपणे काम करण्याची उर्मी देणे, त्यांच्यावर इनडायरेक्ट कंट्रोल ठेवणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या चुका दाखवणे हे तुम्हाला संविधानामधल्या कलम १९ अ एक प्रमाणे विचार मांडण्याचे शस्त्र मिळालेले आहे व ते समाजाच्या विकासासाठीच केलं पाहिजे. म्हणूनच लोकशाहीच्या तीन स्तंभांना वळन देण्याचे काम पत्रकार करतो असे म्हणायला वावग ठरू नये असे यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले तसेच त्यांनी स्वतःशी प्रामाणिकपणे राहून काम केलं तर आपला आरसा स्पष्ट दिसेल विषयी सांगितले .आजचा कार्यक्रम म्हणजे पत्रकारांचा कार्यक्रम आहे, पत्रकार व कवी यांच्याकडे शब्दांचा महासागर असतो व या महासागरातून ही लोकं कसे कसे शब्द काढतात आणि यांच्यासमोर मी बोलावं म्हणजे सचिन तेंडुलकर समोर जस्टीस बुमराणे बोलावं की कशी बॅटिंग करावी.आमच्यापेक्षा तुम्ही उत्कृष्ट बॅटिंग करता कारण लेखणी ही तुमच्या हातामध्ये असते व लेखणीची काय करामत असते हे सर्वांनी पाहिले आहे. याचे जिते जागते उदाहरण म्हणजे संजय राऊत होय.
ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचा माझ्यापेक्षा जास्त तुमचा परिचय असेल तरी देखील त्यांची छोटीशी ओळख मी आपल्यासमोर मांडतो. किशोर दादा ज्या पाटील परिवारातून येतात त्या परिवाराला या परिसरामध्ये मोठी परंपरा आहे या परिवाराने गावाला डॉक्टर ,इंजिनियर, वकील अशी शैक्षणिक क्षेत्रातील कुठलीही गोष्ट बाकी ठेवलेली नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपले नाव लौकिक केले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पत्रकार क्षेत्रातील किशोर दादा असे म्हणायला वावगे ठरू नये.
दादांनी दोन दिवसापूर्वी मला सांगितले ही पत्रकारांसाठी मला रेनकोट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे मी विचार केला पावसाचा कोणताच लवलीश नसताना आता रेनकोट वाटणे बरोबर वाटत नाही. परंतु दादांच्या कार्यामध्ये प्रामाणिकता व सच्चाई आहे म्हणूनच पावसाला देखील आज यावं लागलं म्हणजेच दादांची भावना योग्य होती व ती आज यशस्वी झाली. असे वळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. गेल्या १७ वर्षापासून पत्रकारांसाठी विविध उपक्रम स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट व दैनिक स्वराज्य तोरणच्या माध्यमातून राबवित असतो.या कार्यक्रमा मागचा एकच उद्देश असतो की यानिमित्ताने पत्रकारांचा स्नेह मेळावा साजरा होतो. सर्व जाती-धर्माचे पत्रकार एकत्र उपस्थित राहून आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात. त्यामुळे हा कार्यक्रम यापुढेही अखंडितपणे सुरू राहील अशी मी आपणाला ग्वाही देतो असे यावेळी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशाेर बळीराम पाटील यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काबाडी व आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन, कल्याण यांच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने या शिबिरात बीपी, शुगर, डोळे, चष्मा, तसेच इतर आजारांची तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे पत्रकारिता करत असताना कायद्याचे शिक्षण (एलएलबी) पूर्ण करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यामध्ये अँड- संतोष जानू चव्हाण,अँड- सोमनाथ बाळाराम ठाकरे,अँड- शरद वसंतराव भसाळे,अँड- रवि रामदुलार वर्मा,अँड.श्री.नितीन चंद्रमणी पंडीत,व अँड-मोनिश सुमती मोहन गायकवाड यांचा समावेश होता.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मनोहर तरे व अफसर खान यांनी केले.तर आभार प्रदर्शन आचार्य सुरजपाल यादव यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर पाटील यांचे विशेष योगदान राहिले. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी किशोर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले व भविष्यातही असे उपक्रम राबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.हा उपक्रम पत्रकारांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक आदर्श पायंडा घालणारा ठरला असून, समाजहिताच्या कार्यात पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक सकारात्मक प्रयत्न ठरला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments