मुंबई(रमेश औताडे) : तीन मुख्यमंत्री, अनेक मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, अनेक विभागीय सचिव यांच्या संपर्क अधिकारी राहिलेल्या वीणाताई गावडे यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस त्यांची, मुलं, सुना आणि मित्रमैत्रिणींनी मोठ्या आनंदात, हर्षोल्हासाने साजरा केला.
एक उत्कृष्ट मेहनती अधिकारी म्हणून माहिती जनसंपर्क कार्यालयाकडूनही त्यांना पुरस्कृत करण्यात आले होते. एक तत्पर, विश्वासार्ह आणि पत्रकार क्षेत्रातील सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या आदर्श संपर्क अधिकारी म्हणून त्या पत्रकारांमध्येही लोकप्रिय होत्या.
वीणाताईंच्या या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्यांच्या नेरूळ, नवीमुंबई येथील त्यांच्या हसरा योगा ग्रुपने अतिशय उत्साहात त्यांचे ७५ दिव्यांनी औक्षण केले तसेच ग्रुपमधल्या महिलांनी अनेक कार्यक्रम सादर केले. यावेळी त्यांचे सहकारी आणि माजी संचालक देवेन्द्र भुजबळ, नितीन शिंदे, ज्योती लायजावाला आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.