म
ुंबई (पी. डी. पाटील) : फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळ, मुंबई मंडळाने दरवर्षी प्रमाणे पालवी जत्रोत्सव दि.१३ जुलै २०१५ रोजी विजय बँकेट हॉल, विक्रोळी (पू) मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळ मुंबई आपल्या ग्रामदेवताची राखण देण्यासाठी दरवर्षी पालवी जत्रा आयोजित करते. ग्राम देवतांचे सर्व कुळाचार पार पाडण्या बरोबर समस्त गावकरी एकत्र येऊन परस्पर स्नेह आणि सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी एकत्र येतात. यावेळी पालवी जत्रोत्सव कार्यक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर मोहिमेत सहभागी झालेल्या गावच्या सुपुत्रांचा तसेच गावच्या आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील १०वी, १२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करून त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गावचे समाजसेवक सुभाष पवार यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबदल आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सैनिक संघटनेतर्फे आमदार संजय केळकर यांना फौजी आंबवडे-संघटनेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सा पोलादपूर टाईम्स आणि मराठी वृत्तपत्र लेखक -संघ, मुंबई चे अध्यक्ष रविंद्र मालुसरे यांचा मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . गावचे उद्योजक निवृत्ती डोंगे व वामिका मसाल्याचे पार्टनर राजेंद्र पवार यांचा मंडळाचे सचिव जयदीप पवार यांनी सत्कार केला. यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची व पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या उस्फुर्त सहभागाने जत्रोत्सवाला उत्साह आणि आनंदी वातावरण आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय पवार यांनी करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे माजी अध्यक्ष नितीन पवार, चंद्रकांत पवार, महेंद्र पवार, प्रमोद पवार, सुशिल पवार, विश्वास पवार रघुनाथ आयरे, मंडळाचे सभासद, सल्लागार, वर्गणीदार यांनी मोलाची कामगिरी केली.