सातारा(अजित जगताप) : नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. नऊ महिन्यानंतर मुलगा की मुलगी? तशा पद्धतीने कोण ? याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. मनोमिलनच्या मशिन मधून प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी.. उत्पादन बाहेर पडेल. याची आतापासूनच चर्चा सुरू झालेली आहे.
शंभर वर्षाच्या पुढे गेलेल्या सातारा नगरपालिका कारभारात समाजकारणामध्ये (जाणीवपूर्वक राजकारण हा शब्द टाळला आहे) भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे खणखणीत नाणे चालणार आहे. आता छापा की काटा हे मात्र कुणी विचारू नये. कारण, ज्या बाजूने नाणे घरगळत जाते. ती तिसरी बाजू अजून उदयास येणार नाही.आलेली नाही.
साताऱ्यात पूर्वी चाळीस नगरसेवक होते. आता त्यामध्ये टक्केवारी वाढून पन्नास एवढी संख्या होणार आहे. पंचवीस महिला नगरसेविका होणार आहेत . त्या ठिकाणी त्यांच्या पतींना काम करण्यासाठी परंपरेनुसार स्पेस मिळणार आहे.
इतर पंचवीस नगरसेवकांपैकी विद्यमान नगरसेवकांमध्ये धाकदुखी सुरू झालेले आहे. कोजागिरी पौर्णिमेला ज्यांच्या पदरात जास्त दूध पडलेले आहे. अशांचा पत्ता कट होण्याची शक्यता ही आहे. त्यामुळे दुधाने तोंड भाजले की ताक सुद्धा फुंकून प्यावे लागते. हा सातारकरांचा नियम आहे. त्याला कोणीही अपवाद ठरणार नाही.प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी आहे.
साताऱ्यात २०१६ साली दोन वार्ड एक प्रभाग झाला. परंतु, कोविडच्या संकटाने व इतर कारणाने २७ डिसेंबर २०२१ पासून बहु चर्चित सातारा प्रशासकीय कारभार अभिजीत पद्धतीने सुरू झाला. त्याला सर्वांचीच मूक संमती मिळाली आणि रान मोकळे झाले. आता अनेक ठिकाणी कुंपण टाकण्यात सुरुवात झाली आहे.
सातारा शहरात नगरसेवकाच्या १६ खुल्या जागा असल्या तरी अनेक जण इच्छुक आहेत .हद्द वाढ झाल्यामुळे इच्छुकांची संख्या ही वाढली आहे. त्यात इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण आणि अल्पसंख्यांक यांना संधी देण्याची मागणी पुढे आलेली आहे. त्यातून कुणाला टाळावे.? हे आता ठरवावेच लागणार आहे. जोपर्यंत राज्याची मर्जी आहे. तोपर्यंत प्रधानाचे कुणीही वाकडं करू शकत नाही. त्यांनी चिंता करू नये.
हे अनेकांनी ओळखून हक्कासाठी लढण्याची भाषा सुरू केली आहे.
सातारा शहरात काही मतदारांचा अनुभव पाहता व नागरी सुविधांबाबत निपक्षपातीपणाने मतदान झाले तर बरेच नवे चेहरे नगरपालिकेत दिसतील. असा अंदाज आहे. सातारा नव्हे तर संपूर्ण महिला आरक्षण नगरसेविका प्रभागात नगरसेविका पती, पालिका अधिकारी व ठेकेदार यांची महायुती याला धक्का लागणार नाही. याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्या अर्थाने अनेकांची उठा बस सुरू झालेली आहे. इतर फिफ्टी-फिफ्टी बाबत इच्छुकांनाच निर्णय घ्यावा लागणार आहे. ही काळ्या दगडावरील रेघ आहे. बाकी इतरांच्या स्वबळाच्या वल्गना सुरूच आहेत. त्याला खत पाणी घालण्याचे काम इमाने द्वारे होईल याबद्दलही शंका नाही.
_______________________________
फोटो– सातारा नगरपालिका लोगो व फोटो