कराड(प्रताप भणगे) : श्री संत घाडगेनाथ हायस्कूल कोळे ता. कराड येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले
सन 1984 – 85 साली दहावीत शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी शालेय परिसरात वृक्षारोपण केले. याप्रसंगी त्यांनी विद्यालयास 50 विविध प्रकारचे फळझाडे ,फुलझाडे, शोभिवंत झाडे भेट दिली.
याप्रसंगी
या सर्व विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक परशुराम डाळे यांनी सत्कार केला. या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी
अन्वर इनामदार, सतीश कांबळे, जयवंतराव पाटील, विश्वासराव देसाई, शहाजी मोहिते, भीमराज मठपती, विजय देसाई, मोहम्मद शेख, नंदा घारे, पुष्पा घारे, लता पाटील, अफसाना मुजावर, नंदा चव्हाण, रमेश देसाई, सुरेश देसाई, विजय देसाई, जनार्दन खोत, तानाजी घारे उपस्थित होते.