Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रश्री कांडकरी विकास मंडळतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा सन - २०२५ चे रविवारी...

श्री कांडकरी विकास मंडळतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा सन – २०२५ चे रविवारी दादर येथे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु. पो. कासार कोळवण गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री कांडकरी विकास मंडळ( मावळतीवाडी)तर्फे यांना वाडीतील दहावी- बारावी आणि पदवीधर झालेले विद्यार्थी -विद्यार्थिनी यांचा गुणगौरव सोहळा रविवार दि.२० जुलै २०२५ रोजी दुपारी ठिक-३:३० वाजता दादर येथील २०५, दुसरा मजला,पर्ल सेंटर, सेनापती बापट मार्ग,येवले चहाच्या वर ,दादर ( पश्चिम) मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मंडळाच्या सर्व ग्रामस्थांनी विशेषतः तरुणांनी मोठया संख्येने उपस्थिती राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्ष- श्री.संतोष विठ्ठल करंबेळे,सचिव- श्री.राजाराम रामा रावणंग,खजिनदार-श्री.दिलीप गणपत तोरस्कर आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा समिती पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, महिला कार्यकारणी, युवक कार्यकारणी यांनी केले आहे. या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात दहावी(S.S.C ) उत्तीर्ण विद्यार्थी कुमारी.भुमी सुनील करंबेळे -७६टक्के,कुमारी.प्राची प्रविण धावडे -७२.४०टक्के, कुमार.यश अशोक तोरस्कर -७०टक्के,कुमारी.अक्षरा दिपक करंबेळे-६५. २०टक्के, कुमारी.सेजल सतीश करंबेळे -६३. २०टक्के, कुमारी.तन्वी अनंत करंबेळे-६०. २० टक्के,कु.अनिकेत अनिल धावडे -६३ टक्के, कु.संकेत संतोष धावडे -४६टक्के तर बारावी(HSC) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कुमार.नौरंग सचिन करंबेळे ८२. ३३टक्के,कुमार.प्रणव संजय करंबेळे – ८२ टक्के,कुमार.शुभम सुनील दळवी -७३. ५०टक्के,कुमार. गौरांग रामचंद्र घाटबाने -६७. ६३टक्के, कुमारी.आर्यनी नरेश तोरस्कर-६५. ८३टक्के, कुमार.प्रणव अनिल धावडे -५३टक्के,कुमारी.जान्हवी प्रकाश सनगले -४६टक्के,कुमार.जय संतोष कंरबेळे -४५टक्के आणि पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थीमध्ये कु.ओमकार संतोष करंबेळे (B.com),कु. सौरभ संजय करंबेळेBMS (BACHELOR OF MANAGEMENT STUDIES),कुमारी .हर्षदा किशोर करंबेळे(B.Com)यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी श्री कांडकरी विकास मंडळाच्या गौरवशाली परंपरेतील या वर्षीचा शैक्षणिक कार्यक्रम रविवार, दिनांक २० जुलै २०२५ रोजी दादर येथे संपन्न होणार आहे.आजचा गुणवंत-यशवंत विद्यार्थी उद्याचा कुटुंबाचा आणि समाजाचा भाग्यविधाता आहे.या वर्षीच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी श्री कांडकरी विकास मंडळाचे पदाधिकारी, सर्व सभासद, सर्व कार्यकर्ते, तरूण वर्ग आणि जेष्ठ – श्रेष्ठ सन्माननीय मान्यवर यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या या कौतुक सोहळयात आवर्जून उपस्थित राहाणार आहेत.विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या आईवडीलानीही उपस्थित राहून कौतुकात सहभागी व्हावे.कारण मंडळाचा हा कौतुकास्पद शैक्षणिक सोहळा आहे.त्यामुळे मोठया संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन मंडळ तर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments