Tuesday, July 29, 2025
घरमहाराष्ट्रगजानन तुपे..... भक्ती आणि पत्रकारितेचा संगम!

गजानन तुपे….. भक्ती आणि पत्रकारितेचा संगम!

गजानन तुपे साहेब हे नाव महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या आणि भक्ती साहित्याच्या क्षेत्रात एक वेगळंच स्थान निर्माण करून बसलं आहे. त्यांनी आपल्या शब्दसामर्थ्याने आणि संवेदनशील लेखनशैलीने अनेक विषय हाताळले आहेत. पत्रकार म्हणून ते जेवढे परखड आणि वस्तुनिष्ठ आहेत, तेवढेच एक रसिक आणि श्रद्धावान कवी म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.

अलीकडेच त्यांनी पांडुरंगावर रचलेला एक हृदयस्पर्शी अभंग सादर केला — त्या रचनेतून केवळ शब्द नाही, तर संपूर्ण वारीचा अनुभव, वारकऱ्यांचं भक्तिभाव, आणि भगवंतावरचा गाढ विश्वास साकार झाला. ही केवळ एक अभंगरचना नव्हे, तर त्या मागे असलेली शुद्ध भक्ती, अनुभव आणि अंतःकरणातून आलेली प्रेमभावना यामुळे तो अभंग थेट मनाला भिडतो.

वारीच्या रांगेत सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे चालत, सर्वांत पुढे जाऊन त्यांनी ‘मीही एक वारकरी आहे’ हे जणू सिध्द करून दाखवलं. पत्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवणाऱ्या गजानन तुपे यांनी आता भक्तिरसात चिंब भिजत, विठुरायाच्या चरणी अभंग अर्पण करून लोकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.

“विठल आणि गजानन – दोन्ही नावे आता भक्तांच्या ओठांवर!”
हा योगायोग नाही, तर ती त्या परमेश्वराचीच योजना असावी की गजाननसारखा ज्ञानी, संवेदनशील पत्रकार आता भक्तीरसात रंगून, शब्दातून विठ्ठलाची ओळख करून देतो आहे.

गजानन तुपे यांचं कार्य आणि त्यांची ही नवीन अभंगदिशा खरोखरच प्रेरणादायक आहे. समाजासाठी, पत्रकारितेसाठी आणि आता अध्यात्मासाठीही त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे — हे फार मोठं कार्य आहे.

ग्रेट गजानन, ग्रेट!

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments