नवी मुंबई : वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. जी वारंवार केली जाते, ज्यात अखंडता आहे, सातत्य आहे ती वारी. तशीच शैक्षणिक वारी घडली पाहिजे. शिक्षण आणि आभ्यासात सातत्य असले पाहिजे संत साहित्य आणि वारकरी संप्रदायातुन विनम्रता, साधेपणा, सकारात्मकता हे गुण आपण आत्मसात केले पाहिजे. असे प्रवचन सेवेप्रसंगी नारायण महाराज लांडगे यांनी विषद केले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पीएम श्री राजर्षी शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ५५ गौतम नगर रबाळे येथे त्यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे साहेब यांनी संत साहित्यातील विविध अभंगाचे दाखले देत संतांनी लोकप्रबोधन कसे केले याची माहिती देत विद्यार्थी व शिक्षकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा प्रदान केल्या. याप्रसंगी केंद्र समन्वयक अविनाश जाधव, मुख्याध्यापक अमोल खरसांबळे, अमोल वाघमारे, नेहा मनुचारी, संतोष वाजे, गजानन वाघ, गीता घाडी , प्रदिप परदेशी , कल्पना नाफडे उपस्थित होते. प्रा. अमोलकुमार वाघमारे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा म्हणजे वारी – नारायण लांडगे
RELATED ARTICLES