महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून अनेक जण घडले आहेत. काहींना गॉडफादर लाभल्यामुळे त्यांचेही नेतृत्व महाराष्ट्रान स्वीकारले आहे. यामध्ये बारामतीच्या पवार कुटुंबीयांचे योगदान खूप मोठे आहे. आजही देशाच्या राजकारणात ठाकरे- पवार पॅटर्न अजूनही टिकून आहे. त्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार व मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा विशेष उल्लेख केला जातो. कृतिशील नेते म्हणून अजित दादा पवार नेहमीच स्पष्टवक्तेपणा व निर्भीडपणा यामुळे राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे नेते म्हणून परिचित आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे बॅलन्सिंग पॉवर असे धोरण राबवले गेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व नेते राज्याची उपमुख्यमंत्री आशाताई अनंतराव पवार (२२ जुलै १९५९) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी आहेत. २ जुलै २०२३ पासून ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. २०२२-२३ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले आहे.
१९९१ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत. अनेकदा मुख्यमंत्री पदाची हुलकावणी मिळाली असली तरी हम होंगे कामयाब एक दिन अशी त्यांची घोडद्धौड सुरू आहे. एक दिवस नक्कीच ते यशस्वी ठरतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा आहे.
२०१९ मध्ये, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु ३ दिवसात दोघांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. तसेच अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवारसाहेब यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले.
मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत पॅनल टाकले आणि ते निवडून सुद्धा आणले. अजितदादा पवार यांनी चेअरमन पद स्वतःकडे स्वीकारून सहकार चळवळ तेही आपली ताकद दाखवून दिली आहे. गेले ३०- ३५वर्षांमध्ये बारामतीच्या राजकारणात अजितदादांची दादागिरी सुरूच आहे. परंतु या दादागिरीचा फायदा सर्वसामान्य गरिबांना होत आहे हे ओघाने नमूद करावे वाटत आहे.
आज अजित दादा पवार यांचे ज्येष्ठ नागरिकांच्या यादीमध्ये नाव येण्यासाठी पाच दहा वर्षाचा अवधी असला तरी अजित दादा म्हणजे तू ना कभी थकेगा.. तू ना कभी रुकेगा.. तू ना कभी झुकेगा असंच त्यांची व्यक्तिमत्व आहे. त्यांना वाढदिवसाच्या सातारा जिल्ह्याच्या वतीने मनापासून हार्दिक शुभेच्छा….
अजित जगताप, मु पो सायगाव ता. जावळी जिल्हा सातारा 9922241299/9156140491
———————————————–
Photo –अजित दादा पवार वेगवेगळ्या रूपात