प्रतिनिधी : रुग्णसेवेत डाॅक्टरांचे योगदान आणि रुग्ण मित्रांच्या समन्वयात्मक भूमिकेला उजाळा देण्यासाठी, ‘रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळा २.०’ चे आयोजन घाटकोपर येथील त्रिधा बॅनक्वेट हॉल येथे करण्यात आले. डाॅक्टर दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम “वाद नको, संवाद पाहिजे – समन्वयातून आरोग्य सेवेचा लाभ पाहिजे” या प्रेरणादायी विचारावर आधारित होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राज्यगीताने झाली. यानंतर दिवंगत रुग्ण मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. सी. जी. शिवराम (माजी अध्यक्ष – एनईबीएस, उपाध्यक्ष – आयएमए महाराष्ट्र) यांनी मार्गदर्शन केले.
तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली, आरोग्य मित्र नागेबाबा परिवाराचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुभाषराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विनोद साडविलकर, डाॅ. रोहित पांडे, डाॅ. वनिता पांडे, डाॅ. श्रुती हळदणकर, मनपा सीडीओ साधना खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांसह शासकीय अधिकारी प्रमोद नांदगावकर, सत्यवान रेडकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यशाळेत विविध रुग्ण मित्र, समन्वयक व सहयोगी संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामध्ये गणेश पवार, रमेश चव्हाण, प्रशांत सावंत, धनंजय पवार, संतोष वेंगुर्लेकर, हर्षल जाधव, छाया भटनागर, दत्तात्रय सावंत, जय साटेलकर, गोविंद मोरे, दिना मिश्रा, श्रद्धा अष्टीवकर, तसेच डाॅ. स्मिता तरे, ॲड. पूजा जाधव, विद्या केदारे, डाॅ. सविता पोटभरे, डाॅ. सुधीर जुवेकर यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निरंजन आहेर, सचिन राणे यांनी केले, तर आनंद सरतापे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली. आभारप्रदर्शन विनोद साडविलकर यांनी केले. कार्यक्रमासाठी लब्धी फायनान्स ग्रुपचे केतन पारेख यांनी सहकार्य दिले.
रुग्णसेवा, सामाजिक समन्वय आणि डॉक्टरांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.