Friday, July 4, 2025
घरमहाराष्ट्रआणीबाणीच्या कालखंडाविषयी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात माहितीपूर्ण छायाचित्र प्रदर्शन

आणीबाणीच्या कालखंडाविषयी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात माहितीपूर्ण छायाचित्र प्रदर्शन

प्रतिनिधी : भारतात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला 50 वर्षे पूर्ण होत असताना केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात 25 जून रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यानिमित्त विष्णुदास भावे नाटयगृहाच्या भव्यतम पॅसेजमध्ये आणीबाणीविषयक छायाचित्र प्रदर्शन संपूर्ण महिनाभराच्या कालावधीकरिता ठेवण्यात आलेले आहे. अशाच प्रकारचे प्रदर्शन सीबीडी बेलापूर येथील महानगरपालिका मुख्यालयातही मांडण्यात आले असून मुख्यालयात विविध कामानिमित्त मोठ्या संख्येने येणारे नागरिक या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी करीत आहेत.

या प्रदर्शनामध्ये भारतात प्राचीन काळापासून सुरु असलेल्या लोकशाही व्यवस्थेची चित्रांकित माहिती तसेच आणीबाणीच्या काळातील घडामोडी आणि लोकशाही रक्षणासाठी लढणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीच्या सबलीकरणासाठी सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी उपक्रम, योजना यांचीही माहिती प्रदर्शिंत करण्यात आली आहे.

वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहाप्रमाणेच महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर प्रदर्शित करण्यात आलेले आणीबाणीविषयक माहितीपूर्ण छायाचित्र प्रदर्शन 24 जुलैपर्यंत ठेवण्यात येणार असून नागरिकांनी आवर्जून भेट दयावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments