प्रतिनिधी : स्वातंत्र्यसैनिक कै. साथी मनोहरपंत चिवटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना आरोग्य पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप 11 हजार रुपये रोख, शाल व सन्मानचिन्ह असे आहे.
या पुरस्कारासाठी आवश्यक निधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री नरसिंह मनोहरपंत चिवटे यांनी आज मराठी पत्रकार परिषदेला 1 लक्ष रुपयांचा ठेव स्वरूपातील धनादेश सुपूर्द केला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते, राज्यसभा सदस्य मा. खा. शरदचंद्र पवार साहेब तसेच व्रतस्थ संपादक श्री मधुकर भावे सर उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व ज्येष्ठ पत्रकार श्री एस. एम. देशमुख सर यांच्याकडे हा धनादेश अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला.
आरोग्य क्षेत्रातील पत्रकारितेला प्रेरणा देणारा हा पुरस्कार वर्षानुवर्षे अधिक प्रभावी व्हावा, या उद्देशाने हा निधी मराठी पत्रकार परिषदेच्या निधीमध्ये जमा करण्यात आला आहे.