Thursday, July 3, 2025
घरमहाराष्ट्रगुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन(रजि.)तर्फे निळकंठ बगळे "सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ ने सन्मानित

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन(रजि.)तर्फे निळकंठ बगळे “सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ ने सन्मानित

मुंबई (शांताराम गुडेकर) : गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन(रजि.)तर्फे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मा.श्री.निळकंठ बगळे साहेब यांना “सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मा.श्री.निळकंठ बगळे साहेब लांजा तालुक्यामध्ये आल्यापासून खूप काही चांगले निर्णय घेऊन चांगले काम करत आहेत.लांजा तालुक्यामध्ये बाहेरून येणारे परप्रांतीय यांची सखोल चौकशी करून त्यांची विचारपूस करत आहेत.आपले कर्तव्य लक्षात घेऊन खूप काही मोलाची चांगली कामे‌ केली. तसेच लांजा तालुकामध्ये कोणत्याही संस्थेचे व समाजाचे कार्यक्रम असले की त्यांना आमंत्रण दिल्यानंतर ते त्या आमंत्रणाचा आदर करून हजर राहतात.त्याचा लांजा मधील नागरिकांना खूप अभिमान आहे.पोलीस निरीक्षक साहेबाना सोमवार( दि.३० जून २०२५)रोजी गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्यावतीने लांजा पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांना सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत करंबळे,उपाध्यक्ष श्री.सुभाष रामाणे,महासचिव- अमोल मेस्त्री,खजिनदार श्री.रवींद्र कोटकर यांच्य उपस्थित लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.निळकंठ बगळे साहेब यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रत्नागिरी शहरी विभागाचे पोलीस अधिकारी व हवालदार तसेच लांजा तालुक्याचे पोलीस अधिकारी व हवालदार. कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
उच्च न्यायालयाचे कर्मचारी,समाजसेवक श्री.चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत,याशिवाय जेष्ठ नागरिक समूहाला पाणी, बिस्कीट वाटप केले जाते.गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात.शिक्षण,समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे.फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत रहाणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांचा मूळ उद्देश आहे.गुरुमाऊली चंद्रभागा फॉउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक यांचा या सर्व कार्यास मोलाचा सहभाग असतो.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments