मुंबई(सदानंद खोपकर) : गुरुवार-राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. या निर्णयाबाबत राज्यात सध्या वादंग सुरू आहे. सध्या हा विषय शैक्षणिक पातळीवरून राजकीय पातळीवर गेला आहे.त्यामुळेच ,पहिलीपासून तीन भाषा’ या विषयावर चर्चा करण्यासाठी शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण. पहिलीपासून तीन भाषा’, या विषयावर चर्चा करण्यासाठी शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शिक्षणकट्टा, आयोजित करण्यात येत आहे.
तिसरी भाषा बंधनकारक करताना शैक्षणिक धोरण-२०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा-२०२४चा दाखला देण्यात आला असला तरी या निर्णयाबाबत राज्यभरात सर्वच क्षेत्रात तीव्र नाराजी आहे.शनिवार, २८ जून २०२५ रोजी दु. ३ ते ५:०० या वेळेत ऋणानुबंध सभागृह, तळ मजला, आयोजित शिक्षण कट्यावर चर्चेसाठी, बालमानस मेंदूतज्ज्ञ डाॅ. श्रुती पानसे बहुभाषिकत्वाचे मानसशास्त्रीय शैक्षणिक आधार, या विषयावर आणि विभागीय शिक्षण मंडळ, वाशीच्या माजी सेक्रेटरी श्रीमती बसंती रॉय पायाभूत स्तरावरील बहुभाषिकत्व,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० आणि शासन निर्णय, या विषयावर राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य, अभ्यासक महेंद्र गणपुले तिसरी भाषा पहिलीपासून का आणि कशी आली? या विषयावर उपस्थितांसमोर मांडणी करणार आहेत.या कार्यक्रमात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ,अभ्यासक, पत्रकार, पालक ,विद्यार्थी यांना नोंदणी करुन आपले विचार मांडता येतील. असे आवाहन शिक्षण विकास मंच, मुख्य समन्वयक,डॉ.माधव सूर्यवंशी, तसेच शिक्षण विभाग प्रमुख,योगेश कुदळे, यांनी केले आहे.