ताज्या बातम्या

२६ ते२८ जूनला वास्तुकलेतील नव्या दिशांचा वेध घेणारी परिषद

मुंबई : डी.वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्या सहकार्याने २६ ते २८ जून दरम्यान नवी मुंबईत परिवर्तन २०२५ या ऐतिहासिक परिषदेला सुरुवात होत आहे. विघटनकारी तंत्रज्ञानासह सह-स्क्रिप्टिंग बदल या थीमखाली होणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील नामवंत तज्ज्ञ वास्तुकला, डिझाइन व शहरीकरणाच्या भविष्यातील शक्यतांचा वेध घेतील. अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत परिषदेचे समन्वयक वास्तुविशारद प्राध्यापक अभय पुरोहित यांनी दिली.

फोस्टर पार्टनर्सने डिझाइन केलेले व लीड प्लॅटिनम रेटिंग प्राप्त डीवाय पाटील सेंटर या परिषदेला साक्षी राहणार आहे. झाहा हदीद, बिग, स्पेनचे नॉर्मन फॉस्टर इन्स्टिट्यूट, स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठ अशा नामवंत संस्थांतून तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

सीओएचे अध्यक्ष अभय पुरोहित आणि डीवाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पाटील यांनी या परिषदेला “फक्त वास्तू नव्हे तर भविष्यातील वारसा घडवणारे व्यासपीठ” म्हणून गौरवले आहे. या परिषदेत ५० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सादरीकरण, कार्यशाळा व संवाद सत्रे होणार असून वास्तुकलेतील नवोपक्रम, नैतिकता आणि टिकाऊपणा या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

परिवर्तन २०२५ ही परिषद वास्तुकलासह भविष्यातील शहरी जगाचा वेध घेणारी ऐतिहासिक घटना ठरणार आहे.यावेळी प्राध्यापक राज ओबेराय, प्राध्यापक जयश्री देशपांडे, प्राध्यापक अपर्ण सुर्वे,प्राध्यापक गजानंद राम उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top