ताज्या बातम्या

कुणबी युवा मंडळाच्या अध्यक्ष पदी गुहागर चे युवराज (संतोष) कांबळे,सरचिटणीस पदी संगमेश्वर चे सचिन रामाने तर खजिनदार पदी रोह्याचे पांडुरंग दोडेकर यांची निवड

मुंबई(शांताराम गुडेकर) : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई सलग्न कुणबी युवा मंडळ यांची सन २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी व पदाधिकारी निवड रविवार दि.२२ जून २०२५ रोजी, सकाळी १०.३० वाजता, कुणबी ज्ञाती गृह, (वाघे हॉल) परेल मुंबई येथे संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सभेला सरचिटणीस कृष्णा वणे यांनी सुरुवात करून निवड प्रक्रिया बाबत माहिती दिली. १०५ वर्ष जुनी असलेली मातृसंस्था आणि तिचा इतिहास, संघाचे ध्येय धोरणे, कामकाज, हक्क अधिकाराची चळवळ याची उपस्थित युवा प्रतिनिधीना माहिती दिली. यावेळी संघ पदाधिकारी उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर, बबन उंडरे, उदय कठे, एड. अवधूत तोरस्कर तसेच संघ सहसचिव माधव कांबळे, प्रमोद खेराडे, रवींद्र कुडतडकर, संजय उमासरे, खजिनदार महेश शिर्के उपस्थित होते. कोकण विभागात कुणबी संघाच्या ४२ पेक्षा जास्त तालुका शाखा आहेत. या शाखांमधून युवा प्रतिनिधी उपस्थित राहून हि निवड प्रक्रिया पार पडली.
यामध्ये कुणबी युवा मंडळ कार्यकारिणी सन 2024-25 ते 2029 पुढील प्रमाणे निवडण्यात आली.अध्यक्ष : युवराज (संतोष) कांबळे (गुहागर),उपाध्यक्ष : मिलिंद चिबडे (महाड पोलादपूर),उपाध्यक्ष : प्रतिक मिसाळ (खेड),उपाध्यक्ष : एड. महेश आंबवले (तळा),उपाध्यक्ष :पुनित खांडेकर (ठाणे शहर),सरचिटणीस: सचिन रामाणे ( संगमेश्वर),सहचिटणीस :पंकज पालकर (माणगाव),सहचिटणीस :नितिन भुवड (मुरुड-जंजिरा),सहचिटणीस :अविनाश आग्रे (लांजा),सहचिटणीस :बारकू बेडल (चिपळूण),खजिनदार:पांडुरंग दोडेकर (रोहा)यांची निवड झाली.सर्व नवनिर्वाचित मध्यवर्ती कुणबी युवा पदाधिकारी,कार्यकारणी सदस्य यांचे हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top