Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्र" प्रिय मतदार " म्हणून मतदारांची झोपमोड ;मतांचा जोगव्यासाठी उमेदवार कोणत्याही थराला…

” प्रिय मतदार ” म्हणून मतदारांची झोपमोड ;मतांचा जोगव्यासाठी उमेदवार कोणत्याही थराला…

प्रतिनिधी(रमेश औताडे) : ईपूर्वी भिंतीवर चुना घेऊन कार्यकर्ते भिंती रंगवायचे. ” ताई माई आक्का … चिन्हावर मारा शिक्का ” , ” बोटावर शाई लावली का आज्जी ” , ” घरातला हक्काचा माणूस ” अशी वाक्य लिहिलेल्या भिंती असायच्या.आता उमेदवारांनी मतदारांची झोप उडवली आहे.

आता व्हॉटसअप , इंस्ट्रा, फेसबुक , चिमणी एक्स , आणि सर्वात म्हणजे मोबाईल फोन वरून रात्री अपरात्री झोपमोड करणारे फोन त्रास देऊ लागले आहेत.

कोणी दवाखान्यात असतो, कोणी स्मशान भूमीत असतो तर कोणी तणावात असतो. धावपळीच्या जमान्यात नोकरी करत असताना साहेबांचा फोन आला की काय असे म्हणून सेव्ह नसलेला फोन उचलला तर .. प्रिय मतदार म्हणत डोक्याची ऐसी तैसी करणारे फोन त्रास देऊ लागले आहेत.

मोदी सरकारने काही दिवसापूर्वी सोशल मध्यम सुधारण्यासाठी कडक नियमावली केली आहे. मोदी सरकारबद्दल काही आक्षेप घेणारे लिखाण कुणी प्रसिद्ध केले तर त्यांचे काही खरे नाही. काही टिव्ही वाहिन्या व वृत्तपत्र या कारवाईचे शिकार झाले आहेत. मग आम्हा मतदारांच्या झोपेचे काय ? असा सवाल मतदार करत आह

मतदार राजा नाही तर मतदार त्रासलेले राजा झाला असून यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे. मोबाईल कंपन्या व दूरसंचार विभाग यांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments